Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 20:35 IST2025-10-11T20:33:00+5:302025-10-11T20:35:57+5:30
Nashik Mumbai Crime: नाशिकमधील विवाहित आणि तिचा मित्र. दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. पण, त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर विश्वासघात. तिला मुंबईला फिरायला जाऊ म्हणून घेऊन गेला आणि त्यानंतर अत्याचार केला.

Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
Nashik Crime News : २०२३ मध्ये त्यांची ओळख झाली. दोघे एकमेकांना ओळखू लागले. दोघांमधील मैत्रीही वाढत गेली. पण, विवाहित असलेल्या मैत्रिणीबद्दल त्याची नियत बदलली. मग त्याने तिला फिरायला जायचं का म्हणून विचारलं. तो तिला फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला घेऊन आला. तिचे बाथरुममधील फोटो आणि व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेलिंग सुरू झाली. थेट घरी जाऊन त्याने तिला धमकी दिली. तिथेच तो थांबला नाही, तर घरातच त्याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर माझ्या मित्रासोबत ठेव म्हणून धमकी देऊ लागला. ही घटना घडली आहे नाशिकमधील इंदिरानगरमध्ये!
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओळखीचा गैरफायदा घेऊन विवाहितेचा फोटो आणि व्हिडीओ गुप्तपणे काढून तिला ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित शकिल तांबोळी (रा. काजीपुरा, भद्रकाली) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
आरोपी म्हणाला, मुंबईला फिरायला जाऊ
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, सप्टेंबर २०२३ मध्ये पीडित तरुणीची ओळख शकिल तांबोळीशी झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्रीचे संबंध वाढले. दोघांमध्ये अधूनमधून व्हॉट्सअॅप आणि फोनवर संवाद होत असे, तसेच शकिल तिच्या घरी येत-जात असे. त्याने तिला मुंबईला फिरायला जाण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर, ऑक्टोबर २०२४ मध्ये ती त्याच्यासोबत मुंबईला गेली.
मैत्रिणीचे बाथरुममधील व्हिडीओ रेकॉर्ड केले
तेथे एका हॉटेलमध्ये थांबल्यानंतर शकिलने बाथरूममध्ये गुप्तपणे कॅमेरा लावून तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. नाशिकला परतल्यानंतर शकिलने हे फोटो आणि व्हिडीओ दाखवत तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. "जर तुला पैसे हवे असतील तर माझ्या बिल्डरसोबत संबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन," अशी धमकी त्याने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
घरी जाऊन पीडितेवर बलात्कार, नंतर सुरू झाले अत्याचाराचे सत्र
२३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शकिल पुन्हा तिच्या घरी आला आणि धमक्या देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याच घटनेचे त्याने व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर देखील वेळोवेळी पीडितेच्या इच्छेविरुद्ध संबंधित संबंध ठेवत राहिला, असेही फिर्यादीत नमूद आहे.