शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी आर्थिक विकासाचा पाया रचला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 29, 2015 09:52 IST

नरेंद्र मोदी लोकप्रियतेत पुढेच असले देशाच्या विकासाचा पाया नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी रचला होता अशी आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे.

ऑनलान लोकमत 

मुंबई, दि. २९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेत पुढेच असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हेदेखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते. तर देशाला विकासाच्या दिशेकडे नेण्यात नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी मोलाची भूमिका बजावली होती अशी आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी  केंद्र सरकारला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यावर मंगळवारी सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. मोदी हे परदेशात लोकप्रिय असून ते अधिक वेगाने देशाला पुढे नेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी मोदींचे अभिनंदनही केले आहे. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस नेत्यांचे कौतुक केले आहे. सोशल मिडीया, प्रसारमाध्यम हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळातही पं. नेहरु, इंदिरा गांधी व राजीव गांधी हे परदेशात लोकप्रिय होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. देश बिकट अवस्थेत होता त्यावेळी देशाच्या आर्थिक विकासाचा पाया नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनीच रचला होता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले. विदेशी कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आमच्या माणसांचे फळबाग व शेती संपवू देणार नाही, परदेशातील कचरा आमच्या तोंडावर मारण्याचा धंदा घातक असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.