शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:40 IST

Narayan Rane statement on Shiv sena: भाजप खासदार नारायण राणे यांचे खळबळजनक विधान, म्हणाले, 'बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती'. पुत्र निलेश राणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असताना वक्तव्य. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण.

भाजप खासदार, माजी मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना आज राहिली नाही, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. राणे मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. यामध्ये एकनाथ शिंदेशिवसेना आणि भाजपा वेगळे लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर राणे यांनी हे वक्तव्य केले असून एकप्रकारे एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील बाळासाहेबांची नाही, याकडेचे राणे यांचा रोख असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. 

१५ व्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 39 ते 40 वर्षं शिवसेनेत काम केले. बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती. बाळासाहेबांनंतर शिवसेना आज राहिली नाही, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. तुमच्याप्रमाणे मी देखील शिवसेना सोडून भाजपात आलो. याच मतदारसंघातून खासदार म्हणून लोकांनी मला निवडून दिले, असे राणे म्हणाले.

घरातच 'मैत्रीपूर्ण' लढतीचे संकेत

मुख्य म्हणजे राणे यांचे ज्येष्ठ पूत्र निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे हे आपली शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना असे दावे करत आहेत.  अशा परिस्थितीत रत्नागिरीतील शिवसेनेच्या उदय सामंत बंधूंविरोधात स्थानिक निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी आलेले राणे आजची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, असे म्हणत आहेत.  सिंधुदूर्गमध्ये नितेश राणे भाजपा वि. निलेश राणे शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. 

देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य..

केवळ भारतातच नाही तर जगात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ११ वर्षांपूर्वी ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था १४ व्या क्रमांकावर होती. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे, असे राणे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rane: Shiv Sena Existed Only Until Balasaheb; Today's Sena Isn't

Web Summary : Narayan Rane claims the Shiv Sena no longer embodies Balasaheb Thackeray's ideals. He highlighted potential friendly fights between BJP and Shinde's Sena in upcoming local elections, hinting at growing tensions between the parties. Rane also praised India's economic growth under Modi.
टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेNilesh Raneनिलेश राणे