शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची संत्री हवीत, चला मग लॉगीन करा...

By admin | Updated: February 8, 2015 01:35 IST

पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्र जगभरात हातपाय पसरत असताना विदर्भातील शेतकऱ्यांनी पुण्याच्या आयटी कंपन्यांमध्ये लॉग-इन करून संत्राविक्रीसाठी खुल्या बाजारपेठेत शिरकाव केला आहे.

हणमंत पाटील ल्ल पुणेपुण्यातील ‘आयटी’ क्षेत्र जगभरात हातपाय पसरत असताना विदर्भातील शेतकऱ्यांनी पुण्याच्या आयटी कंपन्यांमध्ये लॉग-इन करून संत्राविक्रीसाठी खुल्या बाजारपेठेत शिरकाव केला आहे. परिणामी, दलालाच्या मध्यस्थीशिवाय शेतकऱ्यांना आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता आले. त्यातून अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ४४ लाखांची उलाढाल झाली आहे.आॅनलाइन जमान्यात उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना रूढ होत आहे. शेतकरी मात्र दलाल, आडत्यांच्या चक्रव्यूहातून अजून बाहेर पडू शकलेला आहे. यामध्ये व्यापारी व मध्यस्थ गब्बर होत चालले आहेत, पण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मात्र घसरत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पणन महामंडळाशी सलग्न असलेल्या ‘कन्व्हर्जन्स आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल इन्टरव्हेन्शन इन महाराष्ट्र’ (सीएआयएम) व ‘आपुलकी’ या संस्थांनी अमरावती येथे विदर्भातील शेतकऱ्यांच्या एका गटाची बैठक घेतली. या संस्थांनी पुण्यातील २९ आयटी कंपन्यांकडे पत्र पाठवून संत्र्यांच्या आॅनलाइन थेट विक्रीच्या सुविधेसाठी परवानगी मागितली. त्यापैकी ९ आयटी कंपन्या व काही गृहनिर्माण संस्थांनी तयारी दाखविली. त्यानुसार शेतकऱ्यांनी संत्र्याचे पेटारे थेट या कंपन्यांत उतरवले. शेतकऱ्यांकडून व्यापारी ११ रुपये किलोने संत्री घेतात. येथे मात्र शेतकऱ्यांना ४० रुपये भाव मिळाला. पुण्यातील किरकोळ बाजार व मॉलमध्ये संत्री ६० रुपये किलोने विकले जात असताना ग्राहकांना ते ४० रुपये किलोने मिळाल्याने त्यांचाही फायदा झाला. दलालाशिवाय थेट विक्री केल्याने शेतकऱ्यांना ३३ लाखांचा फायदा झाला, असे ‘आपुलकी’चे अभिजित फाळके व ‘सीएआयएम’चे रवींद्र ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आयटी कंपन्यांमध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना थेट विक्रीची संधी मिळाली. त्यामुळे उत्पादकांनीही १ किलोऐवजी ३ किलोच्या आकर्षक पेटीतून संत्राविक्रीस सुरुवात केली. एका पेटीमागे २० रुपयांची सूट देत किफायतशीर भाव ग्राहकांना दिला. महोत्सवातून ‘आत्मविश्वास’ गवसलासंत्रा उत्पादकांसाठी पुण्यातील बालगंधर्व येथे महोत्सव झाला. त्या वेळी थेट पुण्यातील चोखंदळ ग्राहकांशी संवाद साधता आला. महोत्सवात पुणेकरांनी संत्राबर्फीचेही बुकिंग केले होते. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला.- नितीन देशमुख, रवी पाटील, संत्री उत्पादक : अमरावती