शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Nagpur ZP Election Results: काँग्रेसची मुसंडी, राष्ट्रवादीला दोन जागांवर मानावं लागलं समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 2:46 PM

जिल्हा परिषदेत पोटनिवडणुकीनंतरही काँग्रेसचाच वरचष्मा. भाजपाच्या विरोधी पक्षनेत्याचा पराभव.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत पोटनिवडणुकीनंतरही काँग्रेसचाच वरचष्मा. भाजपाच्या विरोधी पक्षनेत्याचा पराभव.

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने ९ जागा जिंकून चांगलीच मुसंडी मारली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला दोनवरच जागांवर समाधान मानावे लागले. विरोधीपक्ष नेत्याचा पराभवाबरोबरच भाजपाला एका जागेचा फटका बसला. जिल्ह्यात काँग्रेसमय वातावरण असतानाही, रामटेकमध्ये शिवसेनेच्या आशिष जैस्वाल यांनी जोर लावल्यानंतरही गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उदय झाला. 

५८ सदस्य असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या २०२० मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे ३० उमेदवार विजयी झाले होते. पण ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य निवडणुक आयोगाने १६ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यात काँग्रेसच्या ७ सदस्यांना फटका बसला. या १६ ही जागा खुल्या प्रवर्गात मोडून पोट निवडणुक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत काँग्रेसने ७ जागा कायम ठेवून अतिरिक्त दोन जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले. या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली असली तरी राष्ट्रवादीला आपल्या ४ जागा कायम ठेवता आल्या नाही.

राष्ट्रवादीचा गड असलेल्या काटोल आणि नरखेडातून राष्ट्रवादीला २ जागांचा फटका बसला.  भाजपाला कामठीत चांगल्याच कानपिचक्या बसल्या. चक्क भाजपाच्या विरोधीपक्ष नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला. सोबतच सदस्यत्व रद्द झालेले तीन सिटींग सदस्यही गमवावे लागले. काटोल नरखेडमध्ये भाजपाने खाते उघडले असले तरी, भाजपाच्या हक्काच्या कामठी विधानसभेत भाजपाला फटका बसला.  रामटेक तालुक्यातील बोथिया पालोरा सर्कलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षाचे उमेदवार असतानाही येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीने सर्वांना पालथे टाकून जिल्हा परिषदेत पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध केले. 

जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार सर्कल             उमेदवार                            पक्ष सावरगाव        पार्वती गुणवंत काळबांडे       भाजपाभिष्णूर            प्रवीण रामभाऊ जोध         राष्ट्रवादीयेनवा              समीर शंकरराव उमप        शेकापपारडसिंगा        मिनाक्षी संदीप सरोदे          भाजपवाकोडी           ज्योती शिरसकर               काँग्रेसकेळवद           सुमित्रा मनोहर कुंभारे          काँग्रेसकरंभाड           अर्चना दीपक भोयर          काँग्रेसबोथिया पालोरा  हरिचंद गुलाब उईके          गोगपागुमथळा            दिनेश बबनराव ढोले         काँग्रेस वडोदा              अवंतिका रमेश लेकुरवाळे  काँग्रेसअरोली             योगेश नागोराव देशमुख      काँग्रेस गोधनी रेल्वे       कुंदा श्यामराव राऊत        काँग्रेसनिलडोह            संजय रामकृष्णा जगताप    काँग्रेसडिगडोह            रश्मी धनराज कोटगुले      राष्ट्रवादी इसासनी          अर्चना कैलास गिरी           भाजपाराजोला            अरुण हटवार                   काँग्रेस

पोट निवडणुकीतील पक्षीय बलाबल काँग्रेस - ९ भाजप - ३राष्ट्रवादी - २शेकाप - १गोंगपा- १

पोट निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल काँग्रेस - ३३भाजप - १४राष्ट्रवादी - ८ शिवसेना - १शेकाप - १गोगपा - १

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदnagpurनागपूरcongressकाँग्रेसBJPभाजपा