शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डचा नकार; जिल्हा बँकेचे पुनर्गठनासाठी हात वर

By admin | Updated: June 20, 2015 02:49 IST

कर्ज पुनर्गठन नाही, राज्यभरातील जिल्हा बँकांची अवस्था वाईट.

विवेक चांदूरकर / अकोला : जिल्ह्यातील शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज पुनर्गठनास असर्मथता दर्शवली असून, आतापर्यंंत एकाही शेतकर्‍यावरील कर्जाचे पुनर्गठन केले नाही. नाबार्डनेच त्यांना मदत देण्यास नकार दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्ज पुनर्गठनापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील ७0 टक्के शेतकरी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न आहेत. यामध्ये प्रामुख्याने गरीब व छोट्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ४१२ सहकारी संस्थांच्या माध्यमातून या बँकेचा कारभार चालतो. जिल्हा बँकांना शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्ड आर्थिक मदत करते. शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्ड ६0 टक्के, राज्य सरकार १५ टक्के, राज्य बँक १५ टक्के, तर बँकेचे १0 टक्के अशी एकूण रक्कम गोळा करून शेतकर्‍यांना वाटप केले जाते. दरवर्षी मागील वसुली करून नवीन कर्जपुरवठा करण्यात येतो; मात्र गतवर्षी दोन्ही हंगामात शेतकर्‍यांचे नुकसान झाले असल्यामुळे त्यांच्याकडे कर्ज भरण्यासाठी व पेरणी करण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे शासनाने मागील कर्ज न भरता कर्ज पुनर्गठनाचा निर्णय घेतला. नाबार्डने या बँकांना आर्थिक मदत देण्यास नकार दिला. त्यातच कर्ज पुनर्गठन करण्यासाठी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेने हात वर केले आहेत. नाबार्ड, शासन व बँकेच्या या फेर्‍यात शेतकरी मात्र भरडला जात आहे. आर्थिक स्थिती सक्षम नसल्यामुळे बँक कर्जांचे पुनर्गठन करू शकत नाही. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील ४१२ सहकारी संस्थांमार्फत १७ जूनपर्यंंत ३९ हजार ७२२ शेतकर्‍यांना २५४ कोटी १४ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ५७.२७ असली तरी बँकेच्यावतीने एकाही शेतकर्‍याच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याचे बँकेने जिल्हा अग्रणी बँकेला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. यासंदर्भात अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँके चे व्यवस्थापक नरेंद्र भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी नाबार्डने आर्थिक मदतीला नकार दिला असल्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे सांगीतले. मात्र त्याच वेळेस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी नाबार्डने आर्थिक मदत दिली नाही म्हणून बँका कर्जाचे पुनर्गठन टाळू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

* इकडे आड तिकडे विहीर

       शेतकर्‍यांचे खाते अनेक वर्षांंपासून याच बँकेत आहे. त्यातच त्यांनी गतवर्षी या बँकेतून पीककर्ज घेतले. त्यांना जिल्हा बँक कर्ज पुनर्गठन करण्यास नकार देत आहे. दुसरीकडे कर्जदार असलेले शेतकरी अन्य राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून नवीन कर्ज घेऊ शकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची इकडे आड व तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.