शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कतेमुळे फसला प्रेयसीच्या हत्येचा कट

By admin | Updated: May 25, 2014 05:33 IST

प्रेमभंगाचा घाव भरलेलाही नव्हता इतक्यात प्रेयसीने केलेली बलात्काराची तक्रार, त्यावरून पोलिसांनी केलेली अटक,

मुंबई : प्रेमभंगाचा घाव भरलेलाही नव्हता इतक्यात प्रेयसीने केलेली बलात्काराची तक्रार, त्यावरून पोलिसांनी केलेली अटक, जामीन मिळविण्यासाठी करावी लागलेली केविलवाणी धडपड आणि अखेरीस झालेली बदनामी या दुष्टचक्राने एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर उभे केले. आयुष्य उद्ध्वस्त करणारी प्रेयसी आणि तिच्या वडिलांची हत्या करण्याच्या इराद्याने त्याला वेडेपीसे केले. याच वेडाच्या भरात तो मध्य प्रदेशातून शस्त्रसाठा घेऊन मुंबईला आला खरा, मात्र सतर्क मालवणी पोलिसांनी त्याला वेळीच गजाआड केले. अमित जैन (३१) असे या आरोपी तरुणाचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा. २००५ मध्ये बी.ई.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो मुंबईत आला. येथे त्याने एमबीएची पदवी घेतली. अभ्यास पूर्ण केल्यानंतर तो एका खासगी बँकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीला लागला. याच दरम्यान एका तरुणीशी त्याची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ही तरुणी त्याच्या नात्यातच होती. काही काळाने त्यांच्या शरीरसंबंध निर्माण झाले. २०१२मध्ये या दोघांमधील संबंध बिघडले. वाद झाला आणि दोघांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर तरुणीने अमितविरोधात बलात्काराची तक्रार पश्चिम उपनगरातील एका पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून अमितला गजाआड केले. सप्टेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ या काळात अमित ठाणे कारागृहात बंद होता. जामिनासाठी त्याची धडपड सुरूच होती. जानेवारी २०१३मध्येच तो जामिनावर सुटला. कारागृहातच तो सुडाने पेटला होता. बाहेर पडताच प्रेयसी व तिच्या वडिलांची हत्या करून बदला घ्यायचा हा विचार त्याने मनोमन पक्का केला होता. त्यासाठी आधी त्याने प्रेयसीला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस तक्रार केल्यानंतर पालकांनी घर बदलल्याने ती त्याच्या हाती लागत नव्हती. मुंबई, मध्य प्रदेशात त्याने जंग पछाडले. अखेर काही दिवसांपूर्वी या तरूणीचा पत्ता त्याला मिळाला. खात्री केल्यानंतर अमित तात्काळ मध्य प्रदेशला रवाना झाला. ८८ हजार रूपये खर्च करून त्याने दोन गावठी पिस्तूल आणि तब्बल २० जिवंत काडतुसे विकत घेतली. हा शस्त्रसाठा घेऊन तो मुंबईत परतला. इथे आल्यानंतर त्याने प्रेयसीची इत्थंभूत माहिती काढली. त्यानुसार शुक्रवारी त्याने मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्वेरोड परिसर हत्येसाठी निवडला. तेथे तो दबा धरून बसला. (प्रतिनिधी)