शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पा कोलासमोर पालिका शरण

By admin | Updated: June 21, 2014 02:21 IST

वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये असलेल्या इमारतींमधील अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका प्रशासनाने आज रहिवाशांसमोर सपशेल नांगी टाकली.

अधिका:यांना पुन्हा रोखले : रहिवाशांविरोधात अवमान याचिका करणार
मुंबई : वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये असलेल्या इमारतींमधील अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका प्रशासनाने आज रहिवाशांसमोर सपशेल नांगी टाकली. आज अनधिकृत मजल्यांचे पाणी, वीज आणि गॅसजोडणी तोडण्यास गेलेल्या पालिका अधिका:यांना  रहिवाशांनी प्रवेशद्वारावरच रोखले. परिणामी रहिवाशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे साहाय्यक पालिका आयुक्त आनंद वागराळकर यांनी सांगितले.
सकाळी सातपासून रहिवाशांनी कम्पाउंड परिसरात दोन्ही प्रवेशद्वारांसमोर होमहवनाला सुरुवात केली होती. शिवाय गुरुवारी रात्रीच रहिवाशांनी कुलूप ठोकत दोन्ही प्रवेशद्वारे बंद केली होती. सकाळी साडेअकरा वाजता पालिका अधिकारी प्रवेशद्वारासमोर दाखल झाले. या वेळी कम्पाउंडबाहेर शेकडो पोलिस तैनात होते. पालिका अधिका:यांनी रहिवाशांना आत येऊ देण्याची विनंती केली. मात्र रहिवाशांनी अधिका:यांची विनंती साफ धुडकावली. रहिवाशांनी मात्र ‘घर द्या, नाहीतर जीव घ्या’ अशा घोषणा देत अधिका:यांना रोखले. (प्रतिनिधी)              
 
अधिका:यांची उडवाउडवीची उत्तरे
पोलीसबळाचा वापर करणार नसलो तरी कारवाई होणारच, असे वागराळकर वारंवार सांगत होते. मात्र प्रवेशद्वार बंद असताना बळाचा वापर केला नाही तर कारवाई होणार कशी, यावर मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देत होते.