शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदांना स्वायत्तता हवी

By admin | Updated: December 30, 2014 01:35 IST

अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एखादी स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारे प्रदीर्घ व यशस्वी वाटचाल करीत असताना, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वायत्तता देणे गरजेचे आहे, त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे, प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे कार्यक्रमात केले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अलिबाग नगरपरिषदेच्या एका विशेष योजनेस खास बाब म्हणून विशेष अनुदान देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.अलिबाग नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या १२ हजार महिला बचत गटांच्या फेडरेशनचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा या गावी जाणारे रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात येणार असून एमएमआरडीएच्या माध्यमातून नियोजन आणि विकास करण्यात येणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यांच्या धर्तीवर अलिबागच्या कोळीवाड्यालाही मदत देण्यात येईल, असे ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, अलिबागचे आमदार पंडीतशेठ पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समीतीच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. नमीता नाईक, आमदार धैयर्शिल पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मॉल्सची निमीर्ती करावी. त्यास राज्य सरकार निश्चित सहाय्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बँकेला दिले.शहर विकास आराखड्यांना तत्काळ मंजुरीची गरजराज्यातील ४८ टक्के लोकसंख्या २६५ शहरांत वास्तव्य करते तर राज्यातील ४४ हजार गावांमध्ये तब्बल ५ कोटी ८ लाख लोक राहातात. राज्याच्या २ लाख २० हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पापैकी ६ हजार कोटी रुपये नागरी प्रशासनावर खर्च करावे लागतात. सरकारने वेळीच शहर आराखडे पूर्ण केले शहरे बकाल झाली. याची गांभीर दखल घेऊन २५ शहरांच्या विकास आराखड्यांना तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत पुणे व कल्याणचे विकास आराखडे राज्य सरकारकडे आले आहेत. त्यांनाही तत्काळ मंजूरी देण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.