शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या पथकाची कॅम्पाकोलातून माघार

By admin | Updated: June 20, 2014 13:18 IST

कॅम्पाकोलातील बेकायदेशीर घरांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे माघारी परतले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २० -कॅम्पाकोलातील बेकायदेशीर घरांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे माघारी परतले आहे. वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असे महापालिका अधिका-यांनी स्पष्ट केले.   
वरळीतील कॅम्पा कोला इमारतीतील १०२ बेकायदेशीर घरांवर कारवाई करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जूनमध्ये या बेकायदेशीर घरांवर कारवाई होणार हे स्पष्ट होते. तीन दिवसांपूर्वी इमारतीतील एका वृध्दाचे निधन झाल्याने कारवाई टळली होती. अखेरीस शुक्रवारी सकाळी महापालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी इमारतीत दाखल झाले. रहिवाशांनी तब्बल दीड ते दोन तास महापालिकेच्या पथकाला इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखून ठेवले. इमारतीत प्रवेशद्वाराजवळच होमहवन केले गेले. महापालिका अधिका-यांनी रहिवाशांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कारवाई झाली तरी चालेल पण मात्र बांधकाम पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली होती. अखेरीस रहिवाशांच्या तीव्र विरोधापुढे नमते घेत अधिका-यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. 
आम्ही रहिवाशांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची माहिती दिली. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आता पुढील निर्णय वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन घेतला जाईल असे या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, कारवाईलाविरोध करण्यासाठी आरपीआय, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. निदर्शने करणा-या काही आरपीआय कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शिवसेना व भाजपने कॅम्पाकोलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार ठरवले आहे.