शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे यांची साथ होती, म्हणून खासदार झालो : श्रीरंग बारणे

By admin | Updated: June 3, 2014 22:11 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ मिळाली, म्हणूनच खासदार होऊ शकलो, अशा भावना मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी : भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ मिळाली, म्हणूनच खासदार होऊ शकलो, अशा भावना मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल्या.मावळ लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी मला शिवसेनेची उमेदवारी मिळावी, म्हणून ते स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले. उमेदवारी निि›त झाल्याचेसुद्धा त्यांनीच मोबाइलवरून कळविले होते. १९९९ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक लढवली. काँग्रेसच्या उमेदवारीवर नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने महापालिका सभेत ही निवड होणार असल्याने अन्य सदस्यांची मदत लागणार होती. त्या वेळी काँग्रेसचे नेते स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याशी संवाद साधून मुंडे यांनी महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा मला पाठिंबा मिळवून दिला होता. कार्यकर्त्यांना खंबीर साथ देणारा नेता हरपल्याने राजकारण, समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पिंपरीतील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स कंपनीच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी कामगार नेते अनंत कुमार यांच्याशी भेट घडवून आणण्याबाबत मी सोमवारी २ जूनला त्यांच्याशी संपर्क साधला होता. लवकरच याबाबत कळवतो, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी त्यांचा काही काळ सहवास लाभला. हे सर्व माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.