शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्ग अपघातानंतर ठप्प

By admin | Updated: May 31, 2014 05:39 IST

भरधाव वेगाने जाणार्‍या कारने रस्ता ओलांडणार्‍या सायकलस्वारास धडक दिल्यामुळे सायकलवरील दोघे जागीच ठार झाले

इगतपुरी : भरधाव वेगाने जाणार्‍या कारने रस्ता ओलांडणार्‍या सायकलस्वारास धडक दिल्यामुळे सायकलवरील दोघे जागीच ठार झाले. मृत झालेले माय-लेक असून या अपघातात सहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपरी गावाजवळ झालेल्या या दुर्घटनेनंतर १० ते १५ हजारांच्या संतप्त जमावाने महामार्ग रात्री उशीरापर्यंत रोखून धरला होता. लहानुबाई चव्हाण यांचा मृतदेह रस्त्यावरच ठेऊन गावकर्‍यांनी आंदोलन केले. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव येथील नंदू भिवा चव्हाण (४२) नेहमीप्रमाणे आईला व मुलाला सायकलवरून घरी घेऊन जात होते. महामार्गावरील पिंपरी सदो फाटयाजवळ रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणार्‍या कारने सायकलला जोरदार धडक दिली. त्यात लहानुबाई भिवा चव्हाण (५५) व नंदू चव्हाण जागीच ठार झाले तर यश नंदू चव्हाण (६) गंभीर जखमी झाला. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून पिंपरी फाटा आणि बोरटेंभा या ठिकाणी आतापर्यंत अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. राष्टÑीय महामार्गाचे अधिकारी आणि टोल वसूल करणारी कंपनीचे अधिकारी ठोस आश्वासन देईपर्यंत मृतदेह रस्त्यावरून न उचलण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प झाली. महामार्गावर सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांचा रांगा लागल्या. रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत झाली. (वार्ताहर)