शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंडला घोडागाडी शर्यत उधळली

By admin | Updated: December 2, 2014 04:38 IST

पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटे पोलिसांनी चक्क टांग्यांची (घोडागाडी) अवैध शर्यत उधळून लावली. टांग्यांचा थरार अनुभवण्यासाठी शेकडोंचा जमाव द्रुतगती मार्गावर सज्ज

मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटे पोलिसांनी चक्क टांग्यांची (घोडागाडी) अवैध शर्यत उधळून लावली. टांग्यांचा थरार अनुभवण्यासाठी शेकडोंचा जमाव द्रुतगती मार्गावर सज्ज असल्याने शर्यतीची आमंत्रणे आधीपासूनच सुटली असावीत. तसेच या शर्यतीवर मोठ्या प्रमाणावर सट्टा लागला असावा, असा दाट संशय कारवाई करणाऱ्या नवघर पोलिसांना आहे.पहाटे सहाच्या सुमारास शर्यत सुरू होण्याच्या काही मिनिटांआधीच नवघर पोलिसांना खबर मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संपत मुंढे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील काळे,पीएसआय महेश्वर तळेकर यांंच्यासहित चालक श्याम सिंग आणि पोलीस नाईक अशोक शिंदे पूर्व द्रुतगती मार्गावर पोहोचले. तोवर शर्यत सुरू झाली होती. पाच टांगे वायू वेगाने दौडत होते. ही शर्यत पाहण्यासाठी द्रुतगती मार्गावर मुलुंडच्या मौर्या तलावापासून विक्रोळीपर्यंत दुतर्फा शौकिनांची गर्दी होती. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी पाच टांग्यांच्या मागोमाग हे शौकीन आपापल्या बाईक आणि कार घेऊन धावत सुटले. त्यामुळे पोलिसांना पाठलाग करावा लागला. यापैकी एक टांगा जागीच अडवून त्यावरील दोघांना ताब्यात घेण्यात आले. दुसरा टांग्याला पकडण्यासाठी नवघर पोलिसांना ऐरोली खाडीपुलापर्यंत पाठलाग करावा लागला. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विल्यम जोसेफ जसेंटो (२१), रसल आॅस्टिन जसेन्टो (३५), रॉनी बोना परेरा (२७) आणि ब्रँडन जॉन पेसो (२०) अशी आरोपींंची नावे आहेत. हे चौघेही वांद्रे, कलिना परिसरात राहणारे असून, हॉटेलमध्ये काम करतात. पोलिसांनी त्यांना भारतीय दंडसंहितेतील कलम २८९ नुसार अटक केली आहे. या चौघांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. या शर्यतीवर वर मोठ्या प्रमाणात सट्टा लागला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तसेच या शर्यतीचे आयोजन कोणी केले, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)