शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट, सामाजिक क्षेत्राची...सडक सुनी!

By admin | Updated: November 4, 2014 02:32 IST

सदाशिव अमरापूरकर यांचा उल्लेख होताच त्यांच्या चाहत्यांना दोन चित्रपट हमखास आठवतात. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘अर्धसत्य’ आणि महेश भट दिग्दर्शित ‘सडक’

अनुज अलंकार, मुंबईसदाशिव अमरापूरकर यांचा उल्लेख होताच त्यांच्या चाहत्यांना दोन चित्रपट हमखास आठवतात. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘अर्धसत्य’ आणि महेश भट दिग्दर्शित ‘सडक’. ‘सडक’मध्ये त्यांनी साकारलेली ‘तृतीयपंथी महारानी’ विशेष गाजली. असे असले तरी ‘अर्धसत्य’ आणि ‘सडक’ या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका खलनायकी होत्या. या दोन्ही भूमिका माइलस्टोन ठरल्या. त्यामुळे बॉलीवूडमध्येही त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. पण खेदाची गोष्ट ही की, त्यांची ओळख नकारात्मक भूमिका करणारा कलाकार म्हणूनच सीमित राहिली. विविधांगी भूमिका करायला त्यांना तिथे फारसा वावच मिळाला नाही. अमरापूरकर फक्त खलनायकाची भूमिका उत्तम वठवू शकतात, असा एक भ्रम हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झाला. बॉक्स आॅफिसवर एखाद्या कलाकाराचा विशिष्ट धाटणीचा चित्रपट हिट झाला की तोही त्याच साच्यात अडकून पडतो, हा हिंदी चित्रपटसृष्टी आणि पर्यायाने अमरापूरकर यांच्या बाबतीत दैैैवदुर्विलास आहे. अशावेळी कलाकारांकडे दोनच पर्याय उरतात. एक तर वाट्याला येईल ती भूमिका करीत सतत प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करणे; नाहीतर वेगळी भूमिका मिळण्याची वाट पाहणे. जर ती खूप प्रयत्न करूनही मिळालीच नाही तर ती चूक सुधारून पुन्हा जुन्या साच्यात अडकण्याशिवाय पर्याय नसतो. ‘सडक’मधील महाराणीने अमरापूरकरांना लोकप्रियता मिळवून दिली.