आठ महिन्यांच्या मुलाची हत्येनंतर मातेची आत्महत्या

By Admin | Updated: June 11, 2015 03:00 IST2015-06-11T03:00:54+5:302015-06-11T03:00:54+5:30

माहिमच्या गोपी टँक रोड, राव वाडी परिसरातल्या राजीव सोसायटीत राहाणाऱ्या स्वरा सावलाराम कासकर(४२) या गृहिणीने आपल्या आठ महिन्यांच्या

Mother suicides after eight month old child's murder | आठ महिन्यांच्या मुलाची हत्येनंतर मातेची आत्महत्या

आठ महिन्यांच्या मुलाची हत्येनंतर मातेची आत्महत्या

मुंबई : माहिमच्या गोपी टँक रोड, राव वाडी परिसरातल्या राजीव सोसायटीत राहाणाऱ्या स्वरा सावलाराम कासकर(४२) या गृहिणीने आपल्या आठ महिन्यांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करून स्वत: गळा चिरून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रात्री आठच्या सुमारास उघड झाली.
पोलिसांना घटनास्थळी दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. सोबत एक धारदार चाकू, कोयता सापडला. महिलेच्या हातात एक चिठ्ठीही आढळली. त्यात तिने नैराश्येतून आत्महत्या करत आहे, त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले होते, असे परिमंडळ पाचचे उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले. स्वराच्या पतीला नोकरीवरून काढण्यात आले होते. त्यामुळे ती नैराश्येत होती.

Web Title: Mother suicides after eight month old child's murder