शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

राक्षसी संतोष माने जिवंत राहणे धोक्याचे!

By admin | Updated: September 10, 2014 03:10 IST

अशा गुन्हेगाराला जिवंत ठेवणे समाजासाठी घातक ठरेल, हे जेव्हा नि:संशयपणे दिसत असते तेव्हा फाशीखेरीज अन्य कोणतीही शिक्षा न्यायाची ठरत नाही.

मुंबई : सुमारे अडीच वर्षांपूर्वी स्वारगेट डेपोमधून पळविलेली बस पुणे शहराच्या रस्त्यांवर बेछूटपणे चालवून नऊ निरपराध व्यक्तींना चिरडून ठार करणारा व इतर ३७ जणांना गंभीर जखमी करणारा एस.टी. महामंडळाचा बडतर्फ बसचालक संतोष मारुती माने जिवंत राहणे समाजासाठी घातक आहे, असे ठामपणे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने मानेच्या फाशीच्या शिक्षेवर मंगळवारी शिक्कामोर्तब केले.गेल्या ११ डिसेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीविरुद्ध माने याने केलेले अपील फेटाळताना न्या. विद्यासागर कानडे व न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने म्हटले की, माने याने केलेला गुन्हा संपूर्ण समाजमन सुन्न व्हावे एवढा निर्दयी, राक्षसी आणि संतापजनक आहे. अशा गुन्हेगाराला जिवंत ठेवणे समाजासाठी घातक ठरेल, हे जेव्हा नि:संशयपणे दिसत असते तेव्हा फाशीखेरीज अन्य कोणतीही शिक्षा न्यायाची ठरत नाही.हे कृत्य आपल्या हातून वेडाच्या भरात घडले हा माने याने घेतलेला बचाव धादांत खोटा व पश्चातबुद्धीने सुचलेली लंगडी सबब आहे, असे नमूद करीत न्यायालयाने म्हटले की, याउलट एखाद्या पिसाटाला शोभावे असे हे महाभयंकर कृत्य माने याने, परिणामांची जराही तमा न बाळगता, पूर्णपणे शांत डोक्याने केल्याचे पुराव्यांवरून सिद्ध होते. अशी व्यक्ती दया दाखवायला अजिबात पात्र नाही.तरीही या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी खंडपीठाने माने यास मरेपर्यंत फासावर लटकविण्यास आठ आठवड्यांची स्थगिती दिली.स्वारगेट डेपोचे त्या वेळचे सहायक वाहतूक नियंत्रक शशिकांत दमकळे यांनी ड्युटी बदलून देण्यास नकार दिला, याचा राग धरून माने याने हा सूड उगविला होता. त्याचा संदर्भ देत खंडपीठ म्हणते की, अशा नराधमास दया दाखविली तर कोणालाही कायदा हाती घेऊन अपमानाचा बदला घेण्याची आणि त्यातून सहीसलामत सुटण्याची मुभा आहे, असा चुकीचा संदेश जाईल. (विशेष प्रतिनिधी)