शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

आठवडाभरात मॉन्सून राज्यात येणार : चक्रीवादळाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:40 PM

येत्या २० किंवा २१ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्राच्या सीमेवर येण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देकोकणात २४ ते २५ जूनला दाखल होण्याची शक्यता ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता आता खूप कमी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

पुणे : ‘वायू’ चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यानंतर, आता पुढील ४ ते ५ दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, तो कर्नाटकासह, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, दक्षिण कोकणातील काही भाग, गोवा या ठिकाणी येण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़. येत्या २४ ते २५ जूनला मॉन्सूनचे संपूर्ण राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे़  ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता आता खूप कमी झाली असून, त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाले आहे़. ते मध्यरात्री उत्तर गुजरातला धडक देण्याची शक्यता आहे़. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मॉन्सूनची अरबी समुद्रातील शाखा आणि ईशान्य शाखा या दोन्ही शाखा एकाचेवेळी सक्रिय होत आहे़. येत्या ४ ते ५ दिवसांत मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, दक्षिण कोकणचा काही भाग, गोवा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूचा उर्वरित भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग येथे आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़. त्यामुळे येत्या २० किंवा २१ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्राच्या सीमेवर येण्याची शक्यता आहे़. त्यानंतर पुढील ३ ते ४ दिवसांत म्हणजे २४ किंवा २५ जून दरम्यान संपूर्ण राज्यात मॉन्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे़. मॉन्सूनचे ८ जूनला केरळला आगमन झाल्यानंतर, अरबी समुद्रात  ‘वायू’ चक्रीवादळ निर्माण झाले़. त्यामुळे मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला अडथळा निर्माण झाला़.  ‘वायू’ चक्रीवादळाचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याने मॉन्सूनच्या प्रगतीतील अडथळा दूर झाला आहे़. मॉन्सूनने १४ जूनला कर्नाटकातील म्हैसूरपर्यंत मजल मारली होती़. त्यानंतर गेले तीन दिवस तो तेथेच रेंगाळला आहे़. त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे़.  गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ धरणगाव ३०, भिरा २०, धर्मपुरी १९, डहाणू १४, माहूर १४, महाबळेश्वर १२ मिमी पावसाची नोंद झाली होती़.  ......मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट १८ जून रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़. १९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असेल़. ..........विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. २० व २१ जून रोजी विदर्भात उष्णतेची लाट असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलFarmerशेतकरीdroughtदुष्काळ