शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 1:27 PM

Shiv Puja Rituals: महादेवांना बेलाचे पान आणि पांढरी फुले प्रिय असतानाही केतकी अप्रिय का? त्यामागे सांगितली जाते एक कथा... 

वसंताचे आगमन होताच कोरड्या शुष्क पडलेल्या झाडावर केतकीच्या फुलांचे गुच्छ बहरून येतात. पांढरे स्वच्छ पाच पाकळ्यांचे केतकीचे फूल आणि मध्यभागी पिवळी छ्टा अतिशय आकर्षक आणि मनमोहक दिसते. ही फूल आपण देवालाही वाहतो, त्याचा हार करून देवपूजेत वापरतो, मात्र ही फुलं चुकूनही महादेवाला वाहू नये असे शास्त्र सांगते. त्यामागील कथा जाणून घ्या. 

एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवांकडे आले. निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची असे ठरवले. महादेवांनी एक शिवलिंग प्रगट केले आणि दोघांना सांगितले, की या शिवलिंगाचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल. 

ब्रह्मदेव निघाले पृथ्वी आणि पाताळाच्या दिशेने तर विष्णू देव निघाले स्वर्गाच्या सप्तपुरीमध्ये! बराच प्रवास विष्णूंना उत्तर न सापडल्याने ते हार पत्करून परत आले. तर ब्रह्मदेव स्पर्धा जिंकण्याच्या नादात पाताळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले. येताना त्यांनी केतकीचे फुल साक्षीदार म्हणून आले. 

स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शीर धडावेगळे केले आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला, की तू कितीही सुंदर असलीस तरी माझ्या पूजेमध्ये तुझा समावेश होणार आहे. 

तेव्हापासून केतकीचे फुल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही. या पौराणिक कथेची सत्यअसत्यता माहित नाही पण कथेचे तात्पर्य हेच सांगते की आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नका, तसे करणे तुमच्या हिताचे तर नसतेच शिवाय परमेश्वरालाही ते आवडत नाही!

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३