एटीएममध्ये पैसे भरणार्‍याचा प्रताप; पाच लाख चोरले

By Admin | Updated: June 4, 2014 01:06 IST2014-06-04T01:06:56+5:302014-06-04T01:06:56+5:30

एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणार्‍या खासगी कर्मचार्‍यानेच त्यातील पाच लाख रुपये लंपास केले. ही घटना दारव्हा आणि दिग्रस येथील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये घडली.

Money laundering at the ATM; Five million stolen | एटीएममध्ये पैसे भरणार्‍याचा प्रताप; पाच लाख चोरले

एटीएममध्ये पैसे भरणार्‍याचा प्रताप; पाच लाख चोरले

दारव्हा-दिग्रस येथील स्टेट बँक एटीएममधील घटना
दारव्हा (जि.यवतमाळ) : एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणार्‍या खासगी कर्मचार्‍यानेच त्यातील पाच लाख रुपये लंपास  केले. ही घटना दारव्हा आणि दिग्रस येथील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये घडली.
सुरज गुणवंतराव पोळ (२५) रा. शाहूनगर यवतमाळ असे रोकड चोरणार्‍या खासगी कर्मचार्‍याचे नाव आहे. लॉजिक कॅश  सोल्यूशन या संस्थेमार्फत एटीएममध्ये पैशाचा भरणा करण्यात येतो. या संस्थेतच सुरज हा कामाला होता. दिग्रस आणि दारव्हा  येथील एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. दरम्यान, संधी साधून त्याने दारव्हा येथील एटीएममधून ४ लाख  ५0 हजार तर दिग्रस येथील एटीएममधून ५0 हजाराची रक्कम लंपास केली. ही बाब हिशेबादरम्यान लॉजिक कॅश सोल्यूशनचे  संचालक हितेश पोपट यांच्या लक्षात आली. त्यांनी सुरजला ताब्यात घेऊन दारव्हा पोलिसांच्या स्वाधीन केले. वृत्त लिहिस्तोवर  गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Money laundering at the ATM; Five million stolen