शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीला मोदींचा लगाम

By admin | Updated: June 4, 2014 00:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच धोरणात्मक निर्णयावर आपली पकड दाखविली आहे. पेट्रोलियम मंत्रलयाच्या संयुक्त सचिवांनी मंगळवारी दरवाढीचा प्रस्ताव देताच मोदींनी हस्तक्षेप केला.

प्रस्ताव मागे  : संपुआ सरकारचा निर्णय फिरविला
नविन सिन्हा - नवी दिल्ली
संपुआ सरकारने गॅसचे दर 4.2 डॉलरवरून 8.4 डॉलर्पयत वाढविण्याला दिलेली मंजुरी मागे घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच धोरणात्मक निर्णयावर आपली पकड दाखविली आहे. पेट्रोलियम मंत्रलयाच्या संयुक्त सचिवांनी मंगळवारी दरवाढीचा प्रस्ताव देताच मोदींनी हस्तक्षेप केला. पेट्रोलियम मंत्रलयाचे संयुक्त सचिव एम. गिरिधर यांनी पाठविलेला प्रस्ताव आहे त्याच स्थितीत परत पाठविण्यात आला असून कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नसल्याचे कार्मिक मंत्रलयाने आदेशात म्हटले आहे.
आम आदमी पार्टीने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करीत गॅस दरवाढीचा निर्णय रोखला होता. या दरवाढीमुळे रिलायन्स पेट्रोलियमच्या कंपन्यांना दिलासा मिळाला असता. पंतप्रधान कार्यालयाने पेट्रोलियम मंत्रलयाला नवा प्रस्ताव मागितला असून गॅस दरवाढीबाबत नवे पर्याय सुचविण्याचा आदेश दिला. मंत्रलयाला सरकार आणि खासगी क्षेत्रतील कंपन्यांची अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवत निर्णय घ्यावा लागेल. 
अमेरिकेची इराणवरील बंदी किंवा शिथील केलेले र्निबध पाहता सरकारला या देशाकडून गॅस मागवण्याबाबत फेरविचार करावा लागेल. कॅगने पेट्रोलियम मंत्रलय आणि नियामकावर ओढलेले ताशेरे पाहता नव्या सरकारला या अहवालाचा अभ्यासही करावा लागेल. हायड्रोकार्बनच्या महासंचालकांनी रिलायन्सच्या केडी-डी 6 या क्षेत्रतून तेल काढण्यावर कोणतेही नियंत्रण ठेवले नसल्याचे कॅगने म्हटले होते. हायड्रोकॉर्बन विभागाने याआधी रिलायन्सला दंड ठोठावला आहे, असे एका ज्येष्ठ अधिका:याने सांगितले.
 
रिलायन्सला लगेच दिलासा नाही
पेट्रोलियम मंत्रलयाने बुधवारी सादरीकरण केल्यानंतरच पंतप्रधान गॅस दराबाबत अंतिम निर्णय घेतील. तोर्पयत रिलायन्सला कोणताही दिलासा मिळणार नाही. या समूहाला तातडीने आर्थिक पॅकेज दिले जाण्याची शक्यता सूत्रंनी फेटाळली आहे.