शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 10:12 IST

Maharashtra Assembly Election 2024, Aditya Thcakeray vs Sandip Deshpande: गेल्या वेळच्या निवडणुकीत ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवत होता. यामुळे राज ठाकरेंनी वरळीतून उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे शिवसेनेची आणि त्यापूर्वी मनसेची उमेदवार यादी जाहीर झाली आहे. मनसेने जवळपास मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश मतदारसंघात ठाकरे गटाला आव्हान उभे केले आहे. मनसेचे त्या त्या मतदारसंघात चर्चेत असणारे उमेदवार आहेतच परंतू एक मोठा लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे आदित्य ठाकरेंचावरळी, या मतदारसंघात मनसेने संदीप देशपांडेंना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले आहे. 

गेल्या वेळच्या निवडणुकीत ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवत होता. यामुळे राज ठाकरेंनी वरळीतून उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती. याची राज्यभरात स्तुती झाली होती. परंतू यंदाच्या निवडणुकीत राज यांनी वरळीतून उमेदवार दिला आहे. आदित्य ठाकरे वरळीतून लढण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत शिंदेंच्या बंडामुळे वरळीतील परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेची काही मते ही शिंदेंच्या गोटात गेली आहेत. यामुळे आधीच भाजपापासून फारकत घेतलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आपलीच काही मते गमवावी लागली आहेत. आता तर मनसेनेही उमेदवार दिल्याने या मतविभाजनात आणखी भर पडणार आहे. 

मनसेने उमेदवार दिल्याने आदित्य ठाकरेंच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे शिंदेंनी अद्याप आपले मुंबईतील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. माहिममधून राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे हे उभे ठाकले आहेत. आता उद्धव ठाकरे शिवसेना आणि महायुती अमित ठाकरेंविरोधात काय भूमिका घेतात याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघही बदलू शकतात, अशी चर्चा आहे. 

अमित ठाकरेंना उमेदवारी दिली तर माहिममध्ये ठाकरे गट उमेदवार देणार नाही, असे सांगितले जात होते. परंतू, मनसेने वरळीत आदित्य ठाकरेंना आव्हान दिल्याने आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

मविआचे जागावाटप...

 काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर मंगळवारी सुरू झालेल्या महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. रात्री उशीरा ठरल्यानुसार काँग्रेस आणि उद्धवसेनेतील जागा वाटपावर मार्ग काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस सर्वाधिक १०५ च्या घरात जागा लढणार आहे, त्याखालोखाल उद्धवसेना ९५ च्या घरात आणि शरद पवार गट ८४ च्या घरात जागा लढवणार असून उरलेल्या जागा लहान मित्र पक्षांना सोडण्यात आल्याचे मविआतील सूत्रांनी सांगितले. दीर्घ काळ चाललेल्या या बेैठकीत मविआला पाठिंबा दिलेल्या लहान पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४worli-acवरळीmahim-acमाहीमMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूक