शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : "गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार, तर मग आता..."; राज ठाकरेंनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:55 IST

MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने चिंचवडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार असं म्हटलं आहे. यासोबतच जी काही कामं सुरू आहेत त्याबद्दल गुढीपाडव्याला सविस्तर बोलणार असल्याचंही सांगितलं आहे.  

"मी आज फार काही बोलणार नाही. २० दिवसांवर गुढीपाडव्याचा मेळावा आहे. मी तिकडे दांडपट्टा फिरवणार आहे तर मग आता चाकू आणि सुरे कशाला काढू? सदानंद मोरेंनी आजच्या परिस्थितीवर बोलावं ही माझी अपेक्षा होती. महाराष्ट्राचा जो चिखल झालाय तो फक्त राजकारणासाठी झाला आहे. राजकीय मतं मिळवण्यासाठी तुमची आपापसात डोकी फोडून घेत आहेत, आग लावत आहेत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"एक छोटीशी गोष्ट सांगतो, प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला, तेव्हा त्यांच्याबरोबर लक्ष्मण, सीतामाई सगळ्यांना घेऊन ते निघाले. नाशिकमध्ये आले. १४ वर्षांचा वनवास त्यांनी भोगला. मध्यंतरीच्या काळात रावण आला सीतामाईला पळवून घेऊन गेला. मग वाली आणि सुग्रीव भेटले.  त्यानंतर वानरसेना बरोबर घेतली. सेतू बांधला श्रीलंकेत गेले, तिथे रावणाचा वध केला. या सगळ्या गोष्टी १४ वर्षात त्यांनी केल्या."

"आपण वांद्रे वरळी सी लिंक बांधायला १४ वर्षे घेतली आहेत. जी काही कामं सुरू आहेत ना त्याबद्दल मी सविस्तर गुढीपाडव्याला बोलणार आहेच. मग जातीपातीचे विषय, सोशल मीडियावर टाळकी भडकवणं हे जाणूनबुजून उद्योग सुरू आहेत" असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण