शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : "माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, डोळा मारला की..."; राज ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 13:42 IST

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच दरम्यान "माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच  "खरंतर हा महिला दिन  जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे" असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"पक्षाला १९ वर्षे पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे यांचे आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले. पराभव झाले तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना... तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही" असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.  

"आपला पक्ष, संघटना मजबूत करणं महत्त्वाचं"

"आपला पक्ष आणि संघटना मजबूत करणं जास्त महत्त्वाचं आहे. माझा जो गटाध्यक्ष आहे त्याला आणि त्याच्या घरातल्यांनाही वाटलं पाहिजे की माझ्या मुलाची काळजी घेत आहेत. त्याच्याशी बोलत आहेत. दरवर्षी ८ मार्चला महिला दिन साजरा करतो. काल मला एकाने विनोद पाठवला. २१ जून सर्वात मोठा दिवस समजला जातो. हे सर्व झूठ आहे. २१ जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे. महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो ८ मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षी ७ मार्चला संपतो. ज्यांची लग्न झाली असेल त्यांना कळत असेल मी काय म्हणतोय ते..."

"महिला दिन जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे"

"आपल्याकडे दोन पुरुष आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अरे यात महिला कुठे आहेत?. मागचा पुढचा विचार नाही, बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. पण एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतो. त्या महिलेला विसरतो. खरंतर हा महिला दिन जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. लहान असताना वडील कोणाकडे तरी चाकरी करतात हे ज्या मुलीला पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती कुठे तरी मुघलांकडे चाकरी करतो हे त्या स्त्रीला पाहवलं नाही, जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं."

"आपल्या मुलाकडून स्वराज्य घडवून आणलं"

"जिच्या मनात सुरुवातीच्या मनात स्वराज्य ही गोष्ट पहिल्यापासून होती, तिने आपल्या मुलाकडून स्वराज्य घडवून आणलं. या सर्व इतिहासाच्या मागे एका स्त्रीचं मन होतं. एका महिलेचं मन होतं. ते आपण विसरतो. आज महाराष्ट्रात इतक्या महिला होऊन गेल्या. देशातील पहिली डॉक्टर महिला आनंदीबाई जोशी. आपण या महिलांचा विचार करतो का? इतक्या महिलांचं योगदान आहे खासकरून महाराष्ट्रातून. पुढारलेल्या स्त्रिया इतिहासातील पाहिल्या तर त्या महाराष्ट्रातील मिळतील" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण