पुणे : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच; महापालिकेत मनसे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाची वाट धरली आहे. मनसेचे वारजे-कर्वेनगर येथील विद्यमान नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बिबवेवाडी येथील नगरसेवक दिनेश (पिंट)ू धाडवे यांनी मंगळवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा येथे भाजपा प्रवेश केला. बराटे यांच्यासह मनसेचे कोथरूड येथील माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि मनसेचे अनेक पदाधिकारीही भाजपामध्ये गेले आहेत.या दोन्ही नगरसेवकांसह जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे या वेळी उपस्थित होत्या.
मनसे, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक भाजपामध्ये
By admin | Updated: September 14, 2016 03:56 IST
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच; महापालिकेत मनसे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाची वाट धरली आहे.
मनसे, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक भाजपामध्ये
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}