शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

हिंदुत्वासाठी महायुतीत गेलो तर आनंदच वाटेल; मनसे नेते बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 7:34 PM

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीत सामील होण्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्लीत अमित शाह यांची भेटही घेतली होती. आता आज(दि.9) शिवाजी पार्कावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत असून, यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या मेळाव्यापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. 

काय म्हणाले बाळा नांदगावकर?मीडियाशी बोलताना बाळा नांदगावर(Bala Nandgaonkar) म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने राज ठाकरे भूमिका घेतील. 2014 ला आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंच्या विचारांवर मतदान करणारी बरीच लोकं आहेत. आतापर्यंत आम्ही 'एकला चालो रे'च्या भूमिकेत होतो. आता हिंदुत्वासाठी महायुतीत गोलो, तर वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. पूर्वी शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत होतो, त्यामुळे आता एकत्र आलो, तर त्यात काही नवीन नाही, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकरांनी दिली.

दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही महायुतीत जाण्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, पूर्वीपेक्षा यंदा लोकांची जास्त गर्दी जमली आहे. हे सर्वजण एका अपेक्षेने येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचाच असेल. तर, 2024 ची निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध आहे. राज ठाकरे आपल्या बाजूने असावे, असे प्रत्येक गटाल वाटते. राज ठाकरेंची बाजू धर्माची बाजू आहे, तो जो निर्णय घेतील, तो धर्माचा असेल, अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४