‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:34 IST2026-05-02T06:33:49+5:302026-05-02T06:34:32+5:30

नव्या प्रस्तावित रचनेनुसार परिषद ही २३ सदस्यांची असेल. सदस्य हे नियुक्ती आधारित असून, यामध्ये तज्ज्ञ व प्रादेशिक प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे.

‘MMC’ elections held, who will be in the council?; Nominated or elected?, confusion among doctors | ‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम

‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम

मुंबई - अनेक कायदेशीर अडथळ्यांवर मात करत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची (एमएमसी) निवडणूक पार पडली. नुकताच निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नऊ उमेदवार निवडून आले. मात्र, ही निवडणूक होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडाळाच्या बैठकीत कौन्सिलच्या निवडणुकीऐवजी कौन्सिलवर नामनिर्देशन पद्धतीने नियुक्ती करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कौन्सिलची स्थापना निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार की, शासनाच्या घेतलेल्या निर्णयाच्या नवीन रचनेनुसार राहणार, याबाबत डॉक्टरांमध्ये संभ्रम आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, अधिनियम, १९६५ च्या प्रचलित पद्धतीनुसार ९ सदस्य हे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे निवडणुकीने निवडले जातात. दोन सदस्य हे पदसिद्ध स्वरूपात (आरोग्यसेवा संचालक व वैद्यकीय शिक्षण संचालक) असतात. दोन सदस्य संस्था / विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. पाच सदस्य राज्य शासनाद्वारे नामनिर्देशित केले जातात. एकूण १८ सदस्य कौन्सिलमध्ये होते. 

जुन्या की नव्या पद्धतीने स्थापना ? एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक झाल्यानंतर कौन्सिलची स्थापना कशा पद्धतीने करावी यावर सरकार काय निर्णय घेते, यावर कौन्सिलचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. जुन्या पद्धतीने स्थापना होते, की नवीन रचनेनुसार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.   

नवीन परिषदेत २३ सदस्य
नव्या प्रस्तावित रचनेनुसार परिषद ही २३ सदस्यांची असेल. सदस्य हे नियुक्ती आधारित असून, यामध्ये तज्ज्ञ व प्रादेशिक प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. तसेच, कौन्सिलची रचना अध्यक्ष अधिक ४ पदसिद्ध सदस्य, ६ तज्ज्ञ सदस्य, महसूल विभागातून प्रत्येकी २ वैद्यकीय व्यावसायिक असणार आहेत. अध्यक्ष, सदस्यांची नियुक्ती शोध समितीद्वारे अनुभव, व्यावसायिक क्षमता यांच्या आधारे हाेणार असून, निवडप्रक्रिया पारदर्शक असेल असे मंत्रिमंडळ निर्णयात म्हटले आहे.

याप्रकरणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. तसेच, त्यांना आम्ही निवदेन देऊन जुन्या रचनेप्रमाणे कौन्सिलची स्थापना करावी, अशी विनंती करणार आहोत. कारण, आतापार्यंतची सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने व्यवस्थित पार पडली आहे. - डॉ. संतोष कदम, नवनिर्वाचित सदस्य माजी अध्यक्ष आयएमए, महाराष्ट्र.

शिफारसी विचारात घेणार
अध्यक्ष व सदस्य (पदसिद्ध सदस्य वगळता) यांची नियुक्ती शोध समितीच्या शिफारशी विचारात घेऊन राज्य शासनाकडून करण्यात येईल. शोध समिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केली जाईल. 

Web Title : MMC चुनाव परिणाम: परिषद गठन पर भ्रम - निर्वाचित या मनोनीत?

Web Summary : एमएमसी चुनावों में नौ विजेताओं के बावजूद, एक पूर्व निर्णय नामांकन के पक्ष में था। डॉक्टरों को अनिश्चित है कि परिषद चुनावों या नई सरकारी संरचना के माध्यम से बनेगी। भविष्य का परिषद गठन सरकार के निर्णय पर निर्भर करता है।

Web Title : MMC Election Results: Confusion over Council Formation - Elected or Nominated?

Web Summary : Despite MMC elections yielding nine winners, a prior decision favored nominations. Doctors are uncertain if the council will form via elections or new government structure. The future council formation depends on government decision.

टॅग्स :docterडॉक्टर