शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 08:24 IST

मागील ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. - शिंदे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
पंढरपूर : आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांची भेट घेतली आहे. माढा विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह शिंदे एकतर तुतारीकडून लढतील किंवा अपक्ष निवडणूक लढतील, अशी स्पष्ट भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी मांडली.

पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार शिंदे पुढे म्हणाले, मागील ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणी केली आहे. शरद पवारांकडून उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही तर रणजितसिंह शिंदे अपक्ष लढतील. त्यामुळे आता महायुतीचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.  

धनराज शिंदे यांचा विषय आमच्यासाठी संपला
पुतणे धनराज शिंदे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले, त्यांचा विषय आता आमच्यासाठी संपलेला आहे. कौटुंबिक विषय आता पूर्णपणे संपलेला आहे.

हर्षवर्धन पाटील अखेर शरद पवार गटात दाखल 
हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश केला. येथील दूधगंगा दूध संघाच्या सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रवेशाची घोषणा केली.

 पक्षाध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेशाचा आग्रह धरला. यामुळे आपण व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यापुढचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांना आहेत. त्यांचा निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.  
 

टॅग्स :Babanrao Shindeबबनराव शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस