शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 23:28 IST

Mira Bhayandar Municipal Corporation Election: भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील खासदार, आमदार यांच्या नातलगांना उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांचे पुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने खासदार, आमदार यांच्या नातलगांना महापालिका निवडणुकीची उमेदवारी जाहीर केल्याने मीरा भाईंदर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी निवडणुकीच्या तोंडावर लॉन्च केलेल्या पुत्र तकशील ह्याला पालिकेची उमेदवारी देण्याच्या प्रयत्न बारगळणार असल्याची शक्यता आहे. 

राजकारणातील घराणेशाहीवर सुरवातीपासून टीका करणाऱ्या भाजपातच मोठ्या प्रमाणात घराणेशाही फोफावल्याचे सातत्याने समोर येत आहे. नगरपरिषद निवडणुकीत तर भाजपाने एकाच कुटुंबातील तब्बल ६ जणांना उमेदवारी देण्याचा प्रताप केल्यावरून भाजपावर टीका होत होती. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाजपाने खासदार, आमदार यांच्या नातलगांना उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

त्या निर्णयाचा फटका भाजपाचे मीरा भाईंदर मधील आमदार नरेंद्र मेहता यांना बसणार आहे. मेहता यांनी त्यांच्या तकशील ह्या मोठ्या मुलास महापालिका निवडणुकी आधी लॉन्च करत थेट भाजपचे मीरा भाईंदर विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष करून टाकले. आमदार पुत्र म्हणून प्रत्येक सभा, कार्यक्रमात तकशील ह्याला भाषण करण्याची संधी पासून मनाचे स्थान दिले जात आहे. 

मुलगा तकशील ह्याने संघटना बांधणीत मेहनत घेत युवकांना जोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाषण देखील तो चांगले करतोय. स्थानिक मेहता समर्थकां मध्ये त्याचे कौतुक होत आहे. आ. मेहतांनी मुलाला महापालिका निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सुरक्षित प्रभागाची तयारी केली गेल्या पासून सर्वात तरुण महापौर म्हणून बनवायचे असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.  मात्र भाजपाच्या निर्णया नंतर आता आ. मेहता यांच्या पुत्रास महापालिकेचे तिकीट दिली जाणार का ? याची चर्चा रंगली आहे. 

ह्या आधी मेहतांनी त्यांची भावजय डिम्पल विनोद मेहता यांना पालिका निवडणुकीत उतरवत महापौर, महिला बालकल्याण सभापती आदी महत्वाची पदे दिली होती. डिम्पल यंदा देखील मैदानात असून त्यांना उमेदवारी मिळणार अशी मिळण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's rule threatens ticket for MLA's son in Mira Bhayandar.

Web Summary : BJP's decision against fielding relatives of leaders jeopardizes the candidacy of Narendra Mehta's son, Takshil, in Mira Bhayandar municipal elections. Despite preparations and local support for Takshil, the party's stance on dynastic politics casts doubt on his chances.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा