शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपात अल्पवयीन नवरीचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: December 19, 2014 04:35 IST

अल्पवयीन असताना शिक्षण सोडून लग्न लावून देण्याच्या विरोधात नववधूने लग्नाच्या मंडपातच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे

उल्हासनगर : अल्पवयीन असताना शिक्षण सोडून लग्न लावून देण्याच्या विरोधात नववधूने लग्नाच्या मंडपातच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आई-वडिलांसह नवरा मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.घाटकोपर येथे राहणाऱ्या सख्ख्या बहिणींचा विवाह उल्हासनगर कॅम्प नं.१ मधील तरुणासोबत उल्हासनगर हिरा मॅरेज हॉलमध्ये होणार होता. लग्नाची तयारी सुरू असताना १४ वर्षांच्या अल्पवयीन नववधूने स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने लग्न मंडपात एकच खळबळ उडून झालेला प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्यात गेला. पोलीस अधिकारी अलका पाटील यांनी अल्पवयीन नववधूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.आई-वडिलांनी शिक्षण सोडून मनाविरोधात व अल्पवयीन असताना उल्हासनगरातील एका तरुणासोबत लग्नाचा घाट घातल्याची प्रतिक्रिया अल्पवयीन नववधूने पोलिसांना दिली आहे. मुलीचा विरोध डावलून मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. या प्रकाराला कंटाळून मुलीने लग्नाच्या मंडपात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांनी घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. मुलीच्या आई-वडिलांसह नवऱ्या मुलावर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.