शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये अल्पवयीन गरोदर मातेचा मृत्यू; पती, सासू, सासरे, आई-वडिलांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 10:05 IST

उपचारादरम्यान अल्पवयीन आईसह पाच महिन्यांच्या अभर्काचाही मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्क, मोखाडा : मोखाड्यातील अल्पवयीन गरोदर माता व तिच्या पाच महिन्यांच्या अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती, तिचे आई-वडील, चुलते, सासू, सासरे यांच्यासह मंडपवाला, लग्न लावणारे भटजी, लग्नातील जेवण बनवणारे आचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोखाडा तालुक्यातील मोऱ्हांडा येथील मंगला जयेश निसाळ (वय १६) ही पाच  महिन्यांची गर्भवती होती. 

तिच्या छातीत व पोटात दुखू लागल्याने तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिच्यासह तिच्या पाच महिन्यांच्या अभर्काचाही मृत्यू झाला. ही घटना आठ जून रोजी घडली. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे प्रथमदर्शनी  पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद  केली होती; परंतु तपासाअंती २२ जून रोजी तिचा पती जयेश रामदास निसाळ (२१) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

मोखाडा तालुक्यात शिक्षणाचा फारसा प्रचार प्रसार  झालेला नाही. आजही येथे एखादी शाळकरी विद्यार्थिनी शिक्षणात हुशार असली, पुढे जाऊन तिची एखादी अधिकारी बनण्याची इच्छा असली तरी तिचे शिक्षण अर्धवट थांबवून आई-वडील लहान वयात लग्न लावून देतात. या घडणाऱ्या घटना थांबायला हव्यात. लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हायला हवी. कायद्याची जरब बसावी यामुळे या घटनेत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कठोर कारवाई केली जाणार आहे. - प्रदीप गीते, सहायक पोलिस निरीक्षक, मोखाडा पोलिस ठाणे

बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई 
त्याचबरोबर मृत मंगलाचे सासू, सासरे, आई-वडील, चुलते, तसेच लग्नातील मंडपवाला, लग्न लावणारे भटजी, जेवण बनवणारे आचारी यांच्यावरही बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू