अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: July 22, 2014 23:54 IST2014-07-22T23:54:06+5:302014-07-22T23:54:06+5:30

मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील 17 वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना 20 जुलै रोजी घडली.

Minor girl gang rape | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

जानेफळ (जि़ बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील 17 वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना 20 जुलै रोजी घडली. यासंदर्भात 22 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत.
पीडित मुलगी रविवारी दुपारी शौचास गेली होती. त्यावेळी पांढ:या रंगाच्या इंडिका कारमध्ये आलेल्या तिघांनी मुलीच्या तोंडावर रुमाल बांधून तिला कारमध्ये बसविले. चालत्या गाडीमध्येच त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी  युवतीला वाशिम जिल्ह्यातील अनसिंग बसस्थानकावर सोडून दिले.भेदरलेल्या युवतीने एका हॉटेलमधून घरी संपर्क साधला. त्यानंतर युवतीच्या नातेवाईकांनी अनसिंग येथे धाव घेतली. युवतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.(वार्ताहर)

 

Web Title: Minor girl gang rape