मंत्रालय लाचखोरी प्रकरण : नरहरी झिरवळ यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:10 IST2026-02-13T14:09:03+5:302026-02-13T14:10:21+5:30
Ministry bribery case: मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यानं खळबळ उडाली असून, या लाकखोरीमुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडले आहेत.

मंत्रालय लाचखोरी प्रकरण : नरहरी झिरवळ यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी
मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यानं खळबळ उडाली असून, या लाकखोरीमुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडले आहेत. तसेच विरोधी पक्षातील काँग्रेसने झिरवळ यांचाय राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका घेतली आहे. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने निष्पक्ष चौकशीसाठी झि तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ यांनी म्हटले आहे.
मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागात झालेल्या लाचखोरीबाबत सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालय सिल केले आहे. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) February 13, 2026
चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या…
‘’चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचाऱ्याृने सांगितल्याची माहिती समोर येतेय. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मांडली आहे. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.