शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम उतरणार विधानसभेच्या आखाडय़ात

By admin | Updated: July 26, 2014 01:41 IST

प्रक्षोभक भाजणबाजी आणि आक्रस्ताळ्या राजकारणासाठी प्रसिध्द असणारी हैद्राबाद येथील मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) हा पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लढविणार

गौरीशंकर घाळे - मुंबई
प्रक्षोभक भाजणबाजी आणि आक्रस्ताळ्या राजकारणासाठी प्रसिध्द असणारी हैद्राबाद येथील मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) हा पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लढविणार असून मुंबईतही उमेदवार आपले उभे करणार आहे. एमआयएमबाबत मुस्लिम समाजात असणा-या आकर्षण पाहता राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी ही धोक्याची सूचना मानण्यात येत आहे.
एमआयएम महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. नेमक्या किती जागा लढविणार याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र राज्यतील निवडक जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणो, जालना, बीड, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांचा यात समावेश असल्याची माहिती एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी दिली. यासंदर्भात ओवेसी यांनी मुंब्रा आणि मुंबईतील पदाधिकारी व कार्यकत्र्याची भेट घेत याबाबत चर्चा केली.
आक्षेपार्ह विधानामुळे ओवेसी काही काळ तुरुंगात होते. सध्या त्यांना राज्यात सभा आणि भाषणबंदी करण्यात आलेली आहे. ओवेसी यांना मुंब्रा आणि मुंबईतील हज हाऊस येथे इफ्तार पार्टी आयोजित करण्यात परवानगी नाकारण्यात आल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. एमआयएमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरलेल्या सत्ताधा-यांनी ही खेळी केल्याचा आरोप ओवेसी यांनी लगावला.  नांदेड महापालिकेत एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान एमआयएमने राज्यात उमेदवार दिले नव्हते.   नवनिर्मित तेलंगणा राज्यात लोकसभेसोबतच विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या. यासाठी महाराष्ट्रात लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांदरम्यान अशी अडचण नसल्याने एमआयएम राज्याच्या राजकीय आखाडय़ात उतरण्याच्या तयारीत असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी समोर आपला परंपरागत मतदार राखण्याचे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)