शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

लाखो तरुणांना खाकी वर्दीची भुरळ !

By admin | Updated: June 1, 2014 01:13 IST

भ्रष्टाचार व लाचखोरीबाबत पोलीस खात्याची सर्वाधिक बदनामी होत असली तरी खाकी वर्दीबाबत तरुणांचे आकर्षण वाढत चालले आहे.

6 जूनपासून छाननी : 15 हजार पदांसाठी 5 लाख 82 हजार ऑनलाइन अर्ज
 
जमीर काझी - मुंबई
 
भ्रष्टाचार व लाचखोरीबाबत पोलीस खात्याची सर्वाधिक बदनामी होत असली तरी खाकी वर्दीबाबत तरुणांचे आकर्षण वाढत चालले आहे. राज्यभरातील साडेपाच लाखांवर सुशिक्षित युवकांना या गणवेशाने भुरळ घातली असून ती प्राप्त करण्यासाठी जीवतोड मेहनत करीत आहेत.
  महाराष्ट्र पोलीस दलातील या वर्षी नवीन व रिक्त अशा एकूण 15 हजार 82 कॉन्स्टेबलची भरती केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल 5 लाख 82 हजार 251 जणांनी ऑनलाइन अर्ज केले असून त्यामध्ये तरुणींची संख्या 7,711 आहे. त्यापैकी अर्ज व शुल्क भरलेले 5 लाख 54 हजार 446 जण प्राथमिक छाननीसाठी पात्र ठरले असून येत्या 6 जूनपासून संबंधित आयुक्तालय/ जिल्ह्याच्या ठिकाणच्या भरती केंद्रावर पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
 पोलीस भरतीत इच्छुकांचे प्रमाण पदाच्या 36-37 पटींनी अधिक आहे. त्यामागे वाढती बेरोजगारी, खासगी नोकरीतील अस्थैर्यता ही प्रमुख कारणो असल्याचे सांगितले जाते. मुंबई, पुणो, ठाणो आदी ठिकाणो वगळता भरतीची प्रकिया विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाईल, असे पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिका:यांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटींवर असली तरी त्यांच्या जीवित व वित्त मालमत्तेच्या रक्षणासाठी सध्या 1 लाख 97 हजार 978 पोलिसांचा फौजफाटा आहे. मात्र, राज्यात  महिलांवरील अत्याचारांसह सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत राहिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार उद्भवत राहिला आहे. त्यामुळे आगामी 5 वर्षामध्ये नव्याने 6क् हजार पोलिसांची टप्प्याटप्प्याने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार, या वर्षामध्ये नवीन 12 हजार व संबंधित घटकांमध्ये 31 डिसेंबरपर्यत रिक्त होणा:या पदांची भरती जाहीर करण्यात आली. त्यानुसार, 5 ते 25 मेर्पयत ऑनलाइन अर्ज करण्याच्या कालावधीत खात्यातील विविध 58 घटकांमध्ये एकूण 5 लाख 82 हजार 225 तरुण-तरुणींनी अर्ज केले. मात्र, त्यापैकी 11 हजार 37क् जणांनी स्वत:हून आपले नाव रद्द केले. तर 27 हजार 8क्5 जणांनी 125 रुपये शुल्क बॅँकेत जमा न केल्याने ते अपात्र झाले आहेत. 
 निवडीची पुढील प्रक्रिया ज्या त्या घटकांतील भरतीच्या केंद्रावर 6 जूनपासून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. सुरुवातीला उमेदवारांची उंची व कागदपत्रंची छाननी केली जाईल़ किमान बारावी पास, पुरुषांसाठी 165 सेंमी तर महिलांसाठी 155 सेंमी उंची व खुल्या प्रवर्गात 25 वर्षार्पयतची अट आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्यांची टप्प्याटप्प्यानुसार शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिका:याने सांगितले.
 
च्मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्वाधिक 257क् पदे भरली जाणार असून त्यासाठी सर्वाधिक 1 लाख 13क्5 उमेदवार इच्छुक आहेत. तर सर्वात कमी 38 जागा नागपूर रेल्वे घटकामध्ये असून त्यासाठी 741 ऑनलाइन अर्ज आले आहेत.  
च्पोलीस भरतीमध्ये नियमाप्रमाणो महिलांसाठी 3क् टक्के आरक्षण असले तरी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या तुलनेमध्ये त्यांचे प्रमाण कमी आहे. 15,क्82 पदांपैकी 4,52क् जागा महिलांसाठी असताना एकूण 7क्,711 तरुणींनी अर्ज भरले असल्याने त्यांना नियुक्तीची अधिक संधी आहे. पुरुषांच्या 1क्,562 जागांसाठी मात्र तब्बल 5 लाख 11 हजार 54क् इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.