शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ

By admin | Updated: June 29, 2016 05:13 IST

गाय व म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये, प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

मुंबई : शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाय व म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये, प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही दूध खरेदी दरवाढ १ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.राज्यातील शासकीय दूध योजनांमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याबाबत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील सद्यस्थितीतील दूधखरेदी दर, उत्पादन खर्च या बाबींचा विचार करून, समितीने केलेल्या दूध दरवाढीच्या शिफारशीला मुख्यमंत्र्यांनी आज मान्यता दिली. शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या गाय आणि म्हशीच्या दूधविक्री दरातही प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गायीचे दूध ३५ रुपये प्रति लीटर तर म्हशीचे ४४ रुपये प्रति लीटर या दराने विक्री करण्यात येईल. या संदर्भातला शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)>असा असेल खरेदी दरया निर्णयामुळे गायीच्या दूधखरेदी दरात प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली असून, शासकीय दूध योजनेमध्ये संकलित होणाऱ्या गायीच्या दुधासाठी खरेदी दर आता २० रुपयांवरून २२ रुपये करण्यात आला आहे, तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर आता २९ रुपयांवरून ३१ रुपये झाला आहे.