लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महालक्ष्मी येथील स्वामी नारायण सेवा आश्रमात २५ वर्षीय सैैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नीरजकुमार यादव असे मृत सैनिकाचे नाव आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात काही अधिकाऱ्यांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या काहीही ठोस सांगता येणार नसून याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}