शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मिहान-सेझची डोकेदुखी वाढली

By admin | Updated: May 27, 2015 01:39 IST

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मात्र महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकून या प्रयत्नांना सुरुंग लावत आहे.

सोपान पांढरीपांडे ल्ल नागपूरएकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मिहान-सेझला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत असताना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मात्र महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकून या प्रयत्नांना सुरुंग लावत आहे. मिहान-सेझमधील वीज प्रकल्पावरून अभिजित समूह व एमएडीसी यांच्यात गेल्या चार वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे प्रकल्प बंद आहे. हा वाद मिटविण्यासाठी एमएडीसीने भारताचे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचा कायदेशीर सल्लाही घेतला आहे. परंतु चार महिन्यांपासून एमएडीसीने त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकून एमएडीसी मिहान-सेझमध्ये गुंतवणूकदार कसे आकर्षित करणार, हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. अ‍ॅटर्नी जनरल रोहतगी यांनी करार संपुष्टात आणणे हे प्रासंगिक ठरणार नाही. कारण त्यामुळे दोन्ही पक्षांची कायद्याची लढाई सुरू होईल आणि ती दीर्घ काळ चालण्याची शक्यता आहे. यामध्ये वीज ग्राहकांचे नुकसान होईल. त्याचप्रमाणे पूर्ण झालेला प्रकल्पही निकामी पडणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामोपचाराने वाद मिटवावा व नवीन वीजदर निश्चित करावे, कायद्याने आवश्यक असलेल्या दीर्घकालीन वीज खरेदी करार करावा, असा सल्ला दिला आहे. यावर एमएडीसीने आजवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नेमलेली उपसमिती सध्या अ‍ॅटर्नी जनरलच्या सल्ल्याचा अभ्यास करीत आहे. लवकरच आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु चार महिन्यांचा विलंब का लागला, या प्रश्नावर सत्रे म्हणाले, हा वाद अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे तो चार-पाच महिन्यांच्या अल्पकाळात सोडविणे शक्य नाही. अभिजित समूहाचे सिनिअर जनरल मॅनेजर सतीश श्रीखंडे म्हणाले, अ‍ॅटर्नी जनरलने आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे एमएडीसीने आता आमच्याशी बोलणी सुरू करावी, विजेचा दर निश्चित करावा आणि दीर्घकालीन वीज खरेदी करार करावा. आम्ही आजही आमचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास तयार आहोत. मिहान-सेझमधील ग्राहक आज प्रति युनिट ५.५० रुपये दराने वीज खरेदी करीत आहेत. आमचा दर नव्याने निश्चित झाला तरी तो ४.६० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही व मिहान-सेझमधील ग्राहकांचा फायदाच होईल. त्याचा एमएडीसीने आवर्जून विचार केला पाहिजे, असेही श्रीखंडे म्हणाले.लोकमतची भूमिकाच्संपूर्णत: तयार असलेला वीज प्रकल्प गेल्या दीड वर्षापासून बंद ठेवणे हा साधनसंपत्तीचा अपव्यय आहे, असे ‘लोकमत’ला वाटते. एमएडीसीने एएमएनईपीएलकडून वीज खरेदी केली नाहीच, परंतु कंपनीला मिहान-सेझच्या बाहेर वीज विक्रीसाठी मज्जाव करून एएमएनईपीएलला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.