शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा हस्तांतरण शुल्कात वाढ?

By admin | Updated: August 13, 2014 03:19 IST

म्हाडाची पंतप्रधान अनुदान निवास व विक्री योजनेतील गाळ्यांच्या हस्तांतरणाबाबत लागू केलेली तिप्पट शुल्कवाढ आता अन्य योजनेतील घरांसाठी आकारण्यात येणार आहे

मुंबई : म्हाडाची पंतप्रधान अनुदान निवास व विक्री योजनेतील गाळ्यांच्या हस्तांतरणाबाबत लागू केलेली तिप्पट शुल्कवाढ आता अन्य योजनेतील घरांसाठी आकारण्यात येणार आहे. मुंबई मंडळाने त्याबाबतचा प्रस्ताव बनविलेला असून, येत्या प्राधिकरणाच्या बैठकीपुढे मांडण्यात येणार आहे. म्हाडाकडून विविध योजनेंतर्गत घर घेतलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील गाळ्यासाठी साडेसात हजार शुल्कावरून २५ हजार भरावे लागणार आहेत. तर अल्प व मध्यम गटासाठी अनुक्रमे ५० हजार व १ लाख भरावे लागतील. उच्च उत्पन्न गटासाठीचे शुल्क ३५ हजारांवरून २ लाख केले आहे. वाल्मीकी आवास व अन्य योजनांमध्ये हे हस्तांतरण शुल्क लागू केले जाईल.मुंबई मंडळाने प्राधिकरणाच्या परवानगीविना २१ मेपासून परस्पर शुल्कवाढ लागू केल्याबद्दल सभापती युसूफ अब्राहनी यांनी आक्षेप घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात प्राधिकरणाकडून त्याबाबत रीतसर मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुढची बैठक २१ आॅगस्टला होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.मुंबई मंडळातील विक्री योजनेतील सदनिका, दुकानगाळे आणि पंतप्रधान अनुदान प्रकल्प योजनेतील गाळ्यांचे विनापरवाना हस्तांतरण, नियमितीकरण झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्याला पायबंद बसण्यासाठी म्हाडाने ‘मित्र’ योजना राबविली असून, त्यामध्ये म्हाडा विनियम १९८१मधील विनियम २४ व २५ या हस्तांतरणासंबंधी तरतुदीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)