शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मेहंदी रेखाटनात विक्रमाला गवसणी!

By admin | Updated: December 28, 2014 01:39 IST

प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने शनिवारी रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी तब्बल ७४ तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला.

गिनीज बुक आॅफ रेकॉर्डकडे प्रस्ताव : प्रिया सुरडकरने सलग ७४ तास काढली मेहंदी जालना : येथील प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने शनिवारी रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी तब्बल ७४ तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला. शेकडो जालनेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रियाने जुना विक्रम मोडीत काढला. प्रियाने ३०० महिलांच्या हातावर सुंदर व वेगवेगळ्या डिझाईनचे मेहंदी रेखाटन केले. दरम्यान, आपण १०० तास पूर्ण करणार असल्याचा मानस तिने लोकमतशी बोलताना व्यक्त केला़प्रियाने २४ डिसेंबर रोजी दुपारी मेहंदी रेखाटन सुरु केले होते. शनिवार सकाळपासूनच विक्रम होणार असल्याने अनेकांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात गर्दी केली होती. शनिवारी रात्री तज्ज्ञ प्रशिक्षक, वकील व साक्षीदार यांच्या उपस्थितीत हा विक्रम नोंदविण्यात आला.बेटी बचावचा संदेश : समाजात स्त्रीभू्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे. समाजामध्ये बेटी बचावचा संदेश सर्वदूर जावा या हेतूनेच विक्रम करण्यासाठी बसले होते. यातून मी हजारो महिलांना बेटी बचावचा संदेश दिला आहे. थोडा थकवा आला असला तरी शंभर तास पूर्ण करणारच, असा ठाम विश्वास प्रियाने व्यक्त केला. पूर्वीचा विक्रम ७३ तासांचा : मेहंदी रेखाटण्याचा विश्वविक्रम नागपूर येथील सुनीता धोटे हिच्या नावावर आहे. तिने ७ ते १० जानेवारी २०१४ दरम्यान ७३ तास ५५ मिनिट मेहंदी रेखाटली होती. जालन्याचा तिसरा विश्व विक्रम : जालना जिल्ह्णासाठी ही अभिमानाची बाब असून प्रियाच्या रुपाने तिसरा विश्व विक्रम नोंदविण्यात आला. यापूर्वी २००७ साली प्रसिद्ध तबला वादक प्रसाद चौधरी यांनी सलग ४८ तास तबला वादन केले होते. तर प्रकाश कोंका यांनी ७६ हजार ६७० स्क्ेवअर फूट रांगोळी काढून विश्व विक्रम केला.तपशील गिनीज बुककडे पाठविणारयाविषयी प्रा. प्रकाश कोंका म्हणाले, प्रिया सुरडकरचा मेहंदी रेखाटनाचा सर्व तपशील लंडनस्थित गिनीज बुक आॅर्फ वर्ल्ड रेकॉर्ड कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण तपासणीअंती तिला विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.