मिरज (जि़ सांगली) : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मिरजेत आयोजित राष्ट्रवादी कार्यकत्र्याच्या बैठकीत मंगळवारी परस्परांना अपशब्द वापरल्याच्या कारणावरून इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची हाणामारी झाली. हाणामारीच्या घटनेमुळे पोलिसांना पाचारण करून बैठक गुंडाळण्यात आली.
मिरजेतील किल्ला भागात एका हॉलमध्ये मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यकत्र्याची बैठक पार पडली. बैठकीस पक्षनिरीक्षक शहाजीबापू पाटील, राहुल पवार, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कार्यकत्र्यानी स्वतंत्रपणो विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन पक्षनिरीक्षकांनी केले. या वेळी इच्छुक उमेदवार योगेंद्र थोरात व महेश कांबळे समर्थक समीर सय्यद यांच्यात बाचाबाची झाली. थोरात समर्थक समाधान कांबळे, समीर सय्यद यांच्या अंगावर माईक घेऊन धावून गेल्याने सय्यद व इतरांनी कांबळे यांना मारहाण केली. भांडण सुरू असताना मध्यस्थीचा प्रय} करणा:या योगेंद्र थोरात व डॉ. महेश कांबळे यांच्यातही धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला. हाणामारीमुळे बैठक गुंडाळण्यात आली. मात्र हॉलबाहेर दोन्ही गटांचे समर्थक पुन्हा आमने-सामने आल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}