शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मजिप्रा’ आर्थिक अडचणीत

By admin | Updated: September 2, 2015 23:48 IST

पश्‍चिम व-हाडातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ८00 कोटींची थकबाकी.

सुनील काकडे/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८00 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम वर्षागणिक वाढतच चालल्याने 'मजिप्रा' आर्थिक अडचणीत सापडले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राज्यात ३८९ नागरी पाणीपुरवठा व २६ नागरी मलनि:सारण योजना पूर्ण केल्या आहेत. याशिवाय ११ हजारपेक्षा जास्त ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामेदेखील ह्यमजिप्राह्णनेच पूर्ण केली आहेत. त्यानुसार, महान धरणावरुन अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पूर्ण करुन अकोला महानगरपालिकेकडे २00५ मध्ये हस्तांतरित केली. तेव्हापासून पाणीपुरवठा योजनेची रक्कम थकीत असून सध्या हा आकडा ५५१ कोटींच्या घरात पोहोचला असल्याची माहिती जीवन प्राधिकरणचे अकोला येथील कार्यकारी अभियंता एस.टी.हुंगे यांनी दिली. अकोला जिल्ह्यातीलच मुर्तीजापूर पालिकेकडे २४ कोटी आणि बाळापूर पालिकेकडे २३ कोटी रुपये थकीत आहेत. बुलडाणा शहराला येळगाव येथील धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. सन २0१२ ची लोकसंख्या गृहित धरुन तयार करण्यात आलेल्या या योजनेचे संपूर्ण काम जीवन प्राधिकरणने पूर्ण करुन २000-२00१ मध्ये ही योजना बुलडाणा नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली; मात्र या कामापोटी निर्धारित रक्कम देण्यास बुलडाणा नगरपालिकेने टाळाटाळ केल्यामुळे सध्या या पालिकेकडे 'मजिप्रा'चे १६ कोटी रुपये थकीत आहेत. चिखली आणि शेगाव नगरपालिकेकडून 'मजिप्रा'ला अनुक्रमे ७ आणि ६ असे १३ कोटी रुपये घेणे आहेत. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबूर्जी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करुन ही योजना जीवन प्राधिकरणने १९८६-८७ मध्ये नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. नागरिकांकडून पाणीकर वसूल करणार्‍या वाशिम पालिकेने 'मजिप्रा'ला पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा आकडा सध्या २५ कोटी रुपयांच्या आसपास पोचला आहे. रिसोड पालिका ३ कोटी आणि मंगरुळपीर पालिकेकडून 'मजिप्रा'ला २७ लाख रुपये घेणे आहेत, अशी माहिती जीवन प्राधिकरणचे वाशिम येथील कार्यकारी अभियंता डी.पी.हळदे यांनी दिली. याशिवाय अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ग्रामिण भागात तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनांची जिल्हा परिषदांकडे प्रचंड थकबाकी असून सध्या या तीन जिल्ह्यांमध्ये जीवन प्राधिकरणचे सुमारे ८0२ कोटी रुपये अडकले आहेत.