महापौर माळवी स्वत:हून पोलिसांत हजर...

By Admin | Updated: February 6, 2015 01:50 IST2015-02-06T01:50:09+5:302015-02-06T01:50:09+5:30

च्लाचप्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी या गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वत:हून पोलिसांत हजर झाल्या. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर अटक केली.

Mayor Malvi visits himself in police ... | महापौर माळवी स्वत:हून पोलिसांत हजर...

महापौर माळवी स्वत:हून पोलिसांत हजर...

च्लाचप्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी या गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वत:हून पोलिसांत हजर झाल्या. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर अटक केली. त्यानंतर त्यांची सुमारे पाच तास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी माळवी यांची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
च्शिवाजी पेठेतील महापालिकेने संपादन केलेली जागा परत देण्यासाठी तक्रारदार संतोष हिंदुराव पाटील यांच्याकडून १६ हजारांची लाच स्वीकारल्याच्या संशयावरून महापौर माळवी व त्यांचा खासगी स्वीय साहाय्यक अश्विन गडकरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले होते. परंतु दुसऱ्या दिवशी रक्तदाब वाढल्याने माळवी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

Web Title: Mayor Malvi visits himself in police ...