शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

मातोश्रीवर ‘नो एंट्री’!

By admin | Updated: December 4, 2014 03:13 IST

शिवसेनेने राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंत्रिपदाकरिता इच्छुक आमदार आणि त्यांच्या समर्थकांचे लोंढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेने राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंत्रिपदाकरिता इच्छुक आमदार आणि त्यांच्या समर्थकांचे लोंढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता मातोश्रीवर धडकू लागल्याने मंगळवारी रात्रीपासून या बंगल्यावर ‘नो एंट्री’ लागू झाली. त्यामुळे बुधवारी दिवसभर अनेकांना मातोश्रीच्या दरवाजातूनच परत फिरावे लागले.सेनेला पाच कॅबिनेट, सात राज्यमंत्रिपदे देण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी मातोश्री गाठून आपली वर्णी लावण्याकरिता उद्धव यांचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. काही आमदारांनी आपल्या समर्थकांची शिष्टमंडळे धाडली. याखेरीज काही आमदारांच्या ‘लॉबिंग’साठी काही लब्धप्रतिष्ठित ‘मध्यस्थ’ मातोश्रीचा दरवाजा ठोठवू लागले. या सगळ्या भाऊगर्दीमुळे उद्धव यांची झोप उडाल्याने परवानगीखेरीज मातोश्रीवर कोणालाही सोडू नये, असा आदेश गेटवरच्या सुरक्षारक्षकांना दिल्याचे समजते.माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची मोटार आज मातोश्रीच्या दरवाजापाशी अडवली गेली. यामुळे दळवी खाली उतरून पोलिसांशी हुज्जत घालू लागले. पोलिसांनी मातोश्रीत संपर्क साधून दळवी आल्याचा संदेश दिला. मात्र बंगल्यातून दळवींना ‘नो एंट्री’चा संदेश मिळाल्याने ते हताश झाले. या वेळी उपस्थित वाहिन्यांच्या पत्रकारांनी दळवींना घेरताच उद्धव हे सध्या बरेच व्यस्त आहेत. सरकारमध्ये सामील होणार म्हटल्यावर त्यांचा कामाचा व्याप वाढला असल्याने त्यांनी ठरावीक लोकांना भेटायचे ठरवले असावे, अशी सारवासारव केल्याचे कळते. (विशेष प्रतिनिधी)> सेनेच्या दारी ‘वेट अँड वॉच’मंगळवारी रात्री प्रताप पाटील-चिखलीकर यांनीही मातोश्री गाठले. त्यांना प्रवेश मिळाला. मात्र उद्धव यांची त्यांच्याशी भेट झाली की नाही ते कळले नाही. मात्र मंत्रिपदाच्या यादीत चिखलीकर यांचे नाव नसल्याने परत जाताना चेहऱ्यावर समाधान नव्हते. शिवसेनेत येताना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते, असे चिखलीकर सांगत आहेत. उदय सामंत हेही आपल्याला मंत्रिपद देऊ केल्याचा दावा करीत आहेत. विदर्भातील सेनेचे दोन आमदार बुधवारी भेट न मिळाल्याने परत गेले, तर रायगडमधील भरत गोगावले यांना मंत्री करा, अशी मागणी करण्याकरिता आलेल्या शिष्टमंडळाला पोलिसांनी पिटाळले.शिवसेनेला परिवहनऐवजी उत्पादन शुल्क !सेनेला भाजपाने मंगळवारी देऊ केलेल्या परिवहन खात्याऐवजी आता उत्पादन शुल्क हे खाते दिले आहे. युतीची अधिकृत घोषणा गुरुवारी केली जाणार आहे. मात्र दोन्ही पक्ष आपापल्या कोट्यातून कमी मंत्री करणार असल्याने शपथविधी विधानभवनसमोरील प्रांगणाऐवजी राजभवनवर होण्याची शक्यता दाट आहे. विधानभवनसमोरील मोकळ्या जागी शपथविधी सोहळ्याकरिता आणलेले तंबू उभारणीचे सामान अचानक ट्रकमध्ये भरून उचलून नेल्याने शपथविधीचे स्थळ बदलले जाण्याची चिन्हे आहेत.