शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानचा घाट पावसाळय़ात धोकादायक

By admin | Updated: September 15, 2014 22:37 IST

माथेरानला जाण्या-येण्यासाठी, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या बाजूनेच मिनी ट्रेन रेल्वेमार्ग आहे.

माथेरान : माथेरानला जाण्या-येण्यासाठी, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या बाजूनेच मिनी ट्रेन रेल्वेमार्ग आहे. दरवर्षीच्या पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे घाटातील कडय़ाच्या मातीची धूप होवून काही भागातील दरडी सटकू लागल्या आहेत. त्यामुळे ट्रेकिंग तसेच वर्षा सहलीचा आनंद लुटणा:यांसाठी  पावसाळय़ात हा घाट असुरक्षित आहे.
मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने माथेरानच्या विकासासाठी एकशे तेवीस कोटी (123) रुपये मंजूर केलेले आहेत. यामध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यासाठी 27 कोटी रुपये, दस्तुरी नाका ते पांडे शेडकरिता 49 कोटी रुपये आणि विविध पॉईंट्सच्या सुशोभीकरणासाठी 47 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या अगोदर हा घाटरस्ता एकपदरी होता. 
तीन वर्षापूर्वी कोकण पॅकेजमधून विद्यमान आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नातून चार कोटी रुपये खचरून दुपदरी वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे या मार्गावर पर्यटकांच्या गाडय़ांमध्ये वाढ झालेली आहे. 
या घाट मार्गाची लांबी 7 किमी आहे. त्याच्या एका बाजूस पाचशे फूट तर काही ठिकाणी आठशे ते हजार फूट खोल दरी असून बाजूला उंच काळा कातळ विस्तीर्ण पसरला आहे.
ठरावीक वळणो अरुंद आहेत.
या घाटाचा काळा कातळ (डोंगर) वन पिस नाही. तो काळय़ा कातळाचे थरावर थर अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे पावसाळय़ातील पाणी मुरुन झ:याच्या स्वरूपात कातळातून येते. सततच्या जोरदार पावसामुळे हा डोंगर एकूणच ठिसूळ बनत चालल्यामुळे पावसाळय़ात दरडी सटकू लागल्या आहेत. या घाटमार्गावर टॅक्सीचालक चोवीस तासात पर्यटकांच्या सेवेस तत्पर असतात. परिवहन महामंडळाची मिनीबससेवा देखील ठरावीक फे:या मारते. सुटय़ांच्या हंगामात विशेषत: पावसाळय़ात शनिवार - रविवार या दिवशी पर्यटकांच्या गाडय़ांचा ताफा देखील मोठय़ाप्रमाणात असतो.
26 जुलैच्या महाभयंकर अतिवृष्टीमध्ये घाटरस्त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले असल्याने डोंगर ढिसूळ बनला आहे. त्यामुळे पावसाळय़ात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सा. बां. खात्याने विविध ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे फलक लावले आहेत. पर्यटक घाटातील धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात. दरवर्षी एखादा अपघात धबधब्याखाली होतो.
 
वळणांचा विस्तार व्हावा
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या घाट रस्त्याच्या डागडुजीसाठी सत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या घाट रस्त्याच्या सुरक्षेसाठी संपूर्ण  काळय़ा कातळाला संरक्षक जाळी लावून धोकादायक वळणांचा विस्तार करुनच बनवावा. पर्यावरणवाद्यांनी माथेरानचा पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.