मराठी पाऊल पडते पुढे...! - अमिताभ यांचा नारा

By Admin | Updated: June 17, 2015 02:58 IST2015-06-17T02:58:20+5:302015-06-17T02:58:20+5:30

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या मराठी पाऊल पडते पुढे..

Marathi steps fall ahead ...! - Amitabh's slogan | मराठी पाऊल पडते पुढे...! - अमिताभ यांचा नारा

मराठी पाऊल पडते पुढे...! - अमिताभ यांचा नारा

मुंबई : ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या मराठी पाऊल पडते पुढे...या ओळींना आपल्या खास शैलीत सादर करत दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मराठीचे गोडवे गायले. यातील विशेष बाब म्हणजे बिग बी ने थेट मराठीत भाषण करुन सर्वांनाच चकित केले. मंगळवारी शतकातील मराठी संपदा या ग्रंथाचे दीनानाथ नाट्यगृहात प्रकाशन झाले.
यावेळी बिग बी म्हणाले, मला मुंबई व महाराष्ट्राने खूप काही दिले आहे. पत्नी, मुले, नातू-नात हे सर्व काही दिले. माझे या भूमीवर खूप प्रेम आहे. चित्रपट क्षेत्राचा एक अंग म्हणून या कार्यक्रमाला मी हजर झालो. आणि मराठी भाषण सादर करण्याचा प्रयत्न केला, अशी ग्वाही देत बिग बींनी सगळ््यांचीच मने जिंकली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. कोषनिर्मितीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Web Title: Marathi steps fall ahead ...! - Amitabh's slogan