शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:19 IST

Toll Collection: महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.

- चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.

केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग बांधण्यावर आलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल टॅक्स घेता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट  केले आहे. यानंतरही टोल टॅक्स वसुलीची रक्कम दरवर्षी पाचशे ते हजार कोटींनी वाढत आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ (फेब्रुवारी २५ पर्यंत) या मागील पाच वर्षांत देशात २ लाख २० हजार ५९० कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून २७ हजार १४ कोटी रुपयांचा टोल वसूल केला गेला. यानंतर राजस्थानमधून २४,२०९ कोटी, महाराष्ट्रातून २१,१०५ कोटी आणि गुजरातमधून २०,६०७ कोटींची टोल वसुली झाली.

वसुलीची रक्कम वाढतीचटोल वसुलीची रक्कम दरवर्षी वाढत आहे. २०२०-२१ मध्ये टोल नाक्याचे उत्पन्न २७,९२६ कोटी रुपये होते. २०२१-२२ मध्ये यात ६००२ कोटी, २०२२-२३ मध्ये १४,१०४ कोटी आणि २०२३-२४ मध्ये ७८५० कोटी रुपयांचा टोल वसूल केला. २०२४-२५ फे. पर्यंत ५४,८२० कोटींचा एकूण टोल वसूल केला गेला.

महाराष्ट्रात किती टोल नाकेमहाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर ७५ पेक्षा जास्त टोल नाके आहेत. मागील पाच वर्षांत मराठी माणसाने २१,१०५ कोटी १८ लाख रुपयांचा टोल दिला आहे. 

महाराष्ट्रात टोल वसुली२०२०-२१    २५९०.८५२०२१-२२    ३३८६.२१२०२२-२३    ४६६०.२१२०२३-२४    ५३५२.५३२०२४-२५    ५११५.३८रक्कम कोटीत/(फेब्रुवारीपर्यंत)

टॅग्स :tollplazaटोलनाकाMaharashtraमहाराष्ट्र