शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या शुभेच्छा पत्रातून ‘मराठी’ गायब

By admin | Updated: December 31, 2014 01:37 IST

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय, असा प्रश्न पडला आहे.

औरंगाबाद : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय, असा प्रश्न पडला आहे. कारण यंदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा पत्रामधील ‘मराठी’च गायब झाली आहे. मराठीची संदेशपत्रे खरेदी करणारे कमी झाल्याने कंपन्यांनी उत्पादनच घटविले आहे. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी हा मोठा धक्काच आहे.स्वदेशी कंपनीने मराठीतील पहिले शुभेच्छा पत्र १९८४-१९८५ साली बाजारात आणले. आकर्षक मुखपृष्ठ, हृदयाला जाऊन भिडणारे काव्य आणि स्नेहाचा स्पर्श यामुळे ही शुभेच्छा पत्रे हातोहात विक्री होऊ लागली. भाषेचा हा मार्केट फंडा लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी १९९७ मध्ये इंग्रजीसोबत मराठी शुभेच्छा पत्रे बाजारात आणली. २०११ पर्यंत इंग्रजीच्या बरोबरीने नव्हे, तर त्याहून अधिक मराठी संदेशपत्रे विक्री होत असत. मात्र नंतर हळूहळू मराठी संदेशपत्रांच्या विक्रीला ग्रहण लागणे सुरू झाले. मागील वर्षी कंपन्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या १० ते १२ नवीन डिझाइन बाजारात आणल्या होत्या. यंदा या संदेशाच्या परंपरेने ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे यंदा एकाही कंपनीने नवीन डिझाइन बाजारात आणलेले नाही. कार्ड उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंग्रजी ग्लोबल भाषा आहे. भारतच नव्हे तर विदेशातही मुंबई व दिल्ली येथून मोठ्या प्रमाणात इंग्रजीची कार्डे निर्यात होतात. मात्र मराठीची कार्डे पुणे व मराठवाड्यातच जास्त विकली जात होती. आता त्यातही मोठी घट आल्याने नवीन डिझाइन्स तयार करून विक्री करणे परवडत नसल्याने नववर्षाच्या शुभेच्छा देणारी मराठीतील शुभेच्छा पत्रेछापली नाहीत. यासंदर्भात औरंगाबाद कार्ड्स अँड गिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुहास देशपांडे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून मराठी शुभेच्छा पत्रांचा खप कमी झाला आहे. दुसरीकडे इंग्रजीतील संदेशांना मागणी वाढली आहे. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेजचा परिणाम शुभेच्छा पत्रांवर नक्कीच झाला आहे; पण इंग्रजीच्या कार्डांना आजही मागणी आहे. शहरात नवीन वर्षाचीे ५० हजार कार्ड विक्री होतात. यंदा इंग्रजीतील ४० ते ४५ नवीन डिझाइन्स बाजारात आली, मात्र मराठीतील एकही नवीन कार्ड बाजारात आलेले नाही. (प्रतिनिधी)च्व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या जगातही इंग्रजी भाषेतील शुभेच्छा पत्रांची मागणी टिकून आहे; पण मागणीअभावी मराठीची शुभेच्छा पत्रे बाजारातून गायब होत आहेत.च्‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’, या सुरेश भट यांनी आपल्या कवितेत मराठीचे जे दु:ख व्यक्त केले ते शुभेच्छा पत्रांच्या उलाढालीतून पुन्हा एकदा समोर आले आहे.