शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना निवेदन; लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:04 PM

Maratha Reservation: राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री अशोक चव्हाण उपस्थित

मुंबई: सर्वोच्च न्यायालयानंमराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं थोड्याच वेळापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. राष्ट्रपतींना पाठवण्याचं निवेदन आम्ही राज्यपालांकडे दिलेलं आहे. या प्रश्नी आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्रराज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. आरक्षणाचा अधिकार केंद्राला असल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. त्यामुळे या प्रकरणी सरकारच्या भावना पोहोचवण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आमच्या भावना ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापर्यंत पोहोचवतील,' असं मुख्यमंत्री म्हणाले.'त्या' शेतकरी अन् कामगारांच्या मुलांसाठी भूषणसिंहराजे होळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्रराज्य सरकारच्या आणि मराठा समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ. त्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली जाईल. त्यांनाही निवेदन देण्यात येईल. आमचा नव्हे, तर जनतेचा निर्णय म्हणून मराठा आरक्षणाचा विचार करा, असं आवाहन आमच्याकडून पंतप्रधानांना करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम सरकार करेल, असंदेखील त्यांनी म्हटलं.मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या प्रयत्नात आहे. त्याबद्दल सरकार काय करणार, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर मराठा समाजानं आतापर्यंत खूप समजूतदारपणा दाखवला आहे. राज्य सरकार समाजाच्या विरोधात नाही, याची त्यांना कल्पना आहे. राज्यातील कोणताच पक्ष या आरक्षणाच्या विरोधात नाही. विधिमंडळात एकमतानं आणि एकमुखानं आरक्षणाचा निर्णय झाला होता. त्यामुळे सगळेच मराठा समाजाच्या सोबत आहेत, असं ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAshok Chavanअशोक चव्हाण