शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस नेत्याची आक्रमक भूमिका

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 23, 2020 18:10 IST

मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. यानंतर आता ओबीसी समाजालाही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी ओबीसी नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार.

ठळक मुद्देओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नकोराज्यात 52 टक्के ओबीसी समाज आहे. त्याचा विचार होणेही गरजेचे आहे.लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींनाही निधी मिळावा

मुंबई - मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सर्वांनी पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, ही आमची भूमिका कायम राहील. राज्यात 52 टक्के ओबीसी समाज आहे. त्याचा विचार होणेही गरजेचे आहे, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.  ते पत्रकारांशी बोलत होते.

ड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी आरक्षण 27 टक्के आहे. भटक्या विमुक्त जमातींना 8 टक्के आरक्षण आहे. यामुळे 19 टक्के आरक्षणात मराठा समाजाला 12 टक्के आरक्षण देता येणार नाही. तसेच ओबीसींचे नुकसान नको, असे म्हणत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मताशीही आपण असहमत असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, अशी आमची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात नुकतीच मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या बैठकीत छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी बोलताना, मंत्रीमंडळाच्या बैठकीतील विषय बाहेर बोलायचे नाहीत, पण ओबीसी विषयावर कायमच बोलत आलो आहे, असेही वडेट्टिवार म्हणाले.

जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान

लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींनाही निधी मिळावा -मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. यानंतर आता ओबीसी समाजालाही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचे नेते आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळ यांना निधी मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण त्याचवेळी ओबीसींवर अन्याय नको इतकीच आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसMumbaiमुंबईOBC Reservationओबीसी आरक्षण