जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 23, 2020 12:04 PM2020-09-23T12:04:29+5:302020-09-23T12:11:54+5:30

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या सोबत समावेश करण्यात आला आहे. यात एकमेव भारतीय कलाकार आयुष्मान खुरानालाही स्थान मिळाले आहे.

Prime minister narendra modi is time 100 most influential list 2020 ayushmann khurrana only indian actor | जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान

जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या सोबत समावेश. या यादीत स्थान मिळवणारा आयुष्‍मान खुराना एकमेव भारतीय कलाकार.गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचाही यादीत समावेश.


वॉशिंग्टन - अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम मॅगझिनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्यासह समावेश करण्यात आला आहे. या यादीत असलेल्या भारतीय व्यक्तींमध्ये बॉलीवुड अ‍ॅक्‍टर आयुष्‍मान खुराना, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंद्र गुप्‍ता आणि शाहीन बाग आंदोलनात भाग घेणाऱ्या बिल्किस यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. (TIME 100 Most Influential List)

टाइम मॅगझिन दरवर्षी ही यादी जाहीर करत असते. यात, वेग-वेगळ्या क्षेत्रांत काम करताना जगाला प्रभावित करणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात येतो. पंतप्रधान मोदी या यादीत एकमेव भारतीय नेते आहेत. यावेळी, जवळपास दोन डझन नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

टाइम मॅगझिनने म्हटले आहे, "लोकशाहीसाठी केवळ स्वतंत्र निवडणुकाच महत्वाच्या नाहीत. यात केवळ कुणाला अधिक मते मिळाली हे समजते. मात्र, या हून अधिक महत्व, ज्या लोकांनी विजेत्याला मतदान केले नाही, अशांच्या अधिकाराचे आहे. भारत 7 दशकांहूनही अधिक काळ जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारताच्या 1.3 अब्ज लोकसंख्येत ख्रिश्चन, मुस्लीम, शिख, बौद्ध, जैन आणि इतर धर्माच्या लोकांचाही समावेश आहे."

मोदी, 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' -
टाइमने गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोदींना त्यांच्या मुखपृष्ठावर स्थान देत जहरी टीकाही केली होती. यावरून देशातील राजकीय वातावरणही तापले होते. यावेळी टाइमने लिहिलेल्या एका लेखात मोदींचा उल्लेख 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' (India's Divider In Chief), असा केला होता. एवढेच नाही, तर ''जगातील सर्वात मोठी लोकशाही पुढील पाच वर्षांसाठी मोदी सरकार सहन करू शकेल का?" असा प्रश्नही टाइमने विचारला होता. हा लेख आतीश तासीर यांनी लिहिला होता.

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

टाइमने केले होते पंतप्रधान मोदींचे कौतुक -
यापूर्वी टाइम मॅगझिनने आपल्या एका लेखात पंतप्रधान मोंदींचे कौतुकही केले होते. या मॅगझिनने 'मोदी हॅज युनायटेड इंडिया लाइक नो प्राईम मिनिस्टर इन डेकेड्स' अर्थात 'मोदींनी भारताला अशा प्रकारे एकजूट केले, जसे दशकांत कुठल्याही पंतप्रधानाने केले नाही,' या मथळ्याखाली मोठा लेख छापला होता. हा लेख मनोज लडवा यांनी लिहिला आहे. लडवा यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 'नरेंद्र मोदी फॉर पीएम' अभियानही चालवले होते. यात 'मोदींच्या सामाजिक विकासाच्या धोरणाने भारतीयांना गरिबीतून बाहेर काढले आहे. यात, हिंदू आणि धार्मिक अल्पसंख्यकांचाही समावेश आहे. हे कार्य, गेल्या कोणत्याही पिढीच्या तुलनेत अत्यंत वेगाने झाले आहे.'

यां नेत्यांचाही यादीत समावेश -
पंतप्रधान मोदींशीवाय या यादीत, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, तैवानच्या राष्‍ट्रपती त्‍साई इंग वेन, जर्मन चांसलर अँजेला मर्केल, जो बिडेन आणि कमला हॅरिस यांच्यासह जगातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

आयुष्‍मान खुराना एकमेव भारतीय कलाकार - 
आयुष्‍मान खुराना हा या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कलाकार आहे. त्याने स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा सन्मन मिळाल्याही माहिती दिली. यावेळी "टाइम मॅगझिनने जारी केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाल्याने अभिमान वाटतो आहे," असे आयुष्‍मानने लिहिले आहे. यावर त्याचे चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दोन तासांतच त्याच्या या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केले आहे. दीपिका पादुकोणनेही आयुष्मानचे अभिनंदन केले आहे.

आयुष्मानला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे -
आयुष्मानने 2012मध्ये विक्की डोनर या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून तो सात्याने हिट चित्रपट देत आहे. 2019 मध्ये त्याचे आर्टिकल 15, बाला, ड्रीम गर्ल, हे तीन चित्रपट प्रसिद्ध झाले आहे. यापूर्वी त्याचा अंधाधुन आणि बधाई हो चित्रपट आला होता. अंधाधुन चित्रपटासाठी आयुष्मानला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

 

Web Title: Prime minister narendra modi is time 100 most influential list 2020 ayushmann khurrana only indian actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.